मुंबईकर घेतात कमी सुट्ट्या?

    23-Nov-2018
Total Views |


 


मुंबई : घडाळ्याच्या काट्यावर चालणारे शहर म्हणून मुंबईची जगभरात ओळख आहे. त्यामुळे न थकता मुंबईकर काम करत असतात. मुंबई ही २४ तास चालू असते असा म्हणतात. पण मुंबईत काम करणारे लोक एवढे व्यस्त असतात की त्यांना मनमोकळेपणाने फिरायला जाण्यासही वेळ नसतो, असे एका ट्रॅव्हल पोर्टलच्या सर्व्हेतून समोर आले.

 

या सर्वेनुसार ऑफिसमधल्या कामांमुळे ५१ टक्के लोक सुट्ट्याच घेत नाहीत. तर ४० टक्के लोक सुट्ट्यांपेक्षा पैसे कमावण्याकडे लक्ष देतात. जगाशी तुलना केली असता मुंबईतील २७ टक्के लोक असे आहेत की ज्यांनी गेल्या वर्षभरात एकही सुट्टी घेतली नाही. तर ४४ टक्के लॉग असे आहेत की ज्यांनी गेल्यावर्षी १० दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेतल्या आहेत.

 

सुट्टी न घेतल्याने मुंबईकरांना आपण यशस्वी झाल्यासारखे वाटते असे या सर्व्हेतून समोर आले. त्यांच्या मते यशस्वी लोक सुट्ट्या घेत नाहीत किंवा कमी सुट्ट्या घेतात. याउलट अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे ९२ टक्के मुंबईकर हे मानसिक आरोग्यासाठी सुट्टी घेतात. याचा अर्थ आरोग्याच्या समस्यांच्या बाबतीत मुंबईकर जास्त सुट्ट्या घेतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/