अनंतकुमार यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2018
Total Views |

नाशिक : भारतीय जनता पार्टीचे नेते, कुशल प्रशासक तसेच दिवंगत केंद्रीय संसदीय कार्य मंत्री अनंतकुमार यांच्या अस्थींचे नाशिकच्या पवित्र गोदावरीच्या रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले.

 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजाविणारे तसेच केंद्रीयमंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे आनंतकुमार यांनी लोकसभेच्या दक्षिण बेंगळुरू मतदार संघातून सलग सहावेळा निवडून येण्याचा पराक्रम केला होता. त्यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यामुळे भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या अस्थींचे नाशिकच्या गोदावरी नदीत विसर्जन करण्यात येणार असे भाजपातर्फे जाहीर करण्यात आले होते.

 

प्रदेश सचिव संजय उपाध्याय अस्थीकलश घेऊन आले होते. रामकुंड परिसरात उपाध्याय यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर अनंतकुमार यांच्या अस्थींचे रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले. पौरोहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, रवी देव आणि प्रतीक शुक्ल यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विविध कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@