
दूध आणि अन्नपदार्थ भेसळ हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गिरीश बापट यांनी ही घोषणा केली. यापूर्वी या गुन्ह्यात फक्त ६ महिन्यांची शिक्षेची तरतूद होती आणि आरोपींना जमीनही लगेच मिळत होता. त्यामुळे भेसळखोरांमध्ये कायद्याचा धाक उरला नव्हता. पण आता भेसळीला आला घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या या नवीन तरतुदीमुळे भेसळ करणाऱ्यांवर जम बसेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/