मुंबई : मुंबई शॉपींग फेस्टिव्हलच्या आयोजनासंदर्भात संबंधीत कंपनीसमवेत करण्यात आलेला करारनामा पर्यटन विकास महामंडळाने महिनाभरापूर्वीच रितसर नोटिस देऊन रद्द केलेला आहे. त्यामुळे महामंडळास किंवा शासनास कोणतेही नुकसान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. महामंडळास २० कोटी रुपयांचा कोणताही तोटा झालेला नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) करण्यात आले आहे.यासंदर्भात विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने एमटीडीसीने खुलासा प्रसिद्धीस दिला आहे.
खुलाशात म्हटले आहे की, दुबई फेस्टीव्हलसारखा उपक्रम मुंबई येथे विशिष्ट कालावधीत आयोजन केल्यास स्थानिक किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांच्या व्यापारास चालना मिळेल, या हेतूने मुंबई मेला शॉपिंग फेस्टीव्हलचे आयोजन डिसेंबर लगत पर्यटन हंगामात करण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा प्रक्रियेमध्ये मेसर्स ओएमसीपीएल ही अभिकर्ता कंपनी पात्र ठरली. एका वर्षासाठी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभावी सलग आयोजनासाठी किमान ५ वर्ष कालावधी असावा, अशी सर्वंकष चर्चा तद्नंतर झाली. त्यानुसार ५ वर्षांसाठी करार करण्यात आला परंतु ५ वर्षांसाठी करण्यात आलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता हा करारनामा पर्यटन विकास महामंडळाने महिनाभरापूर्वीच रितसर नोटीस देऊन रद्द केलेला आहे. त्यामुळे महामंडळास किंवा शासनास कोणतेही नुकसान होण्याचा प्रश्न राहत नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/