शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीतनगराध्यक्षपदासाठी 16 अर्ज दाखल

    21-Nov-2018
Total Views |

17 प्रभागांसाठी 130 अर्ज; आज अर्जांची होणार छाननी

शेंदुर्णी, ता-जामनेर : 
 
20 नोव्हेंबर शेंदुर्णी नगर पंचायतीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम दिनापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 16 तर 17 प्रभागांसाठी एकूण 130 अर्ज दाखल करण्यात आले असून पैकी 11 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
 
अर्ज सादर करण्याच्या एक दिवस मुदत वाढीचा फायदा घेत शिवसेना 5, भाजप-1, अपक्ष- 3, मनसे- 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर नाराजांची भूमिका बघता एकदिवस मुदत वाढीचा फायदा घेत ए. बी. अर्जांमध्ये बदल करण्यात आला आहे. 21 रोजी अर्जांची छाननी होणार आहे.
 
भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेस व काँग्रेस यांचे ए बी अर्ज इच्छुक उमेदवारांच्या अर्जांना लागल्याने बंडखोरीची शक्यता बघता भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेस व काँग्रेस या प्रमुख पक्षांनी काही प्रभागांमधील आपल्या उमेदवारांमध्ये बदल करत नवीन ए.बी अर्ज दाखल केले. तसेच, शिवसेनेचे कालपर्यंत 4 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.परंतु वाढीचा फायदा घेत 5 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
 
नगराध्यक्ष पदासाठीचे महिला ओ बी सी आरक्षण जाहीर झाले असल्याने ओ बी सी प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष बहुमान मिळविण्यासाठी आपापली मोर्चे बांधणी करून इच्छुकांच्या यादीत नाव समाविष्ट करून उमेदवारी अर्ज सादर केले.
 
यामध्ये भाजपाच्या इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांवरून दिसून आले. यामध्ये रा.कॉ.-3, भाजपा- 10, शिवसेना-1, मनसे- 1, अपक्ष 1 असे एकूण 16 अर्ज दाखल करण्यात आले आहे. 17 प्रभागांसाठी 130 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल
 
प्रभाग 1 साठी
 
रा.काँ.- 2, भाजपा - 3, मनसे - 1, अपक्ष-1 असे एकूण 7 उमेदवार,
 
प्रभाग 2 साठी - 
 
रा. काँ.- 2, भाजपा - 3 असे एकूण 5 उमेदवार,
 
प्रभाग 3 साठी -
 
रा.काँ.- 3, भाजपा - 6, शिवसेना-1 असे एकूण 10 उमेदवार,
 
प्रभाग 4 साठी - 
 
रा.काँ.- 2, भाजपा - 3, शिवसेना-1, मनसे-1 असे एकूण 7 उमेदवार,
 
प्रभाग 5 साठी - 
 
रा.काँ.- 4, भाजपा - 3, मनसे- 1 असे एकूण 8 उमेदवार,
 
प्रभाग 6 साठी - 
 
रा.काँ.- 2, भाजपा - 4, अपक्ष - 2 असे एकूण 8 उमेदवार,
 
प्रभाग 7 साठी -
 
रा.काँ.- 2, भाजपा - 3, मनसे - 1 असे एकूण 6 उमेदवार,
 
प्रभाग 8 साठी - 
 
काँग्रेस- 2, भाजपा - 2, शिवसेना - 1 असे एकूण 5 उमेदवार,
 
प्रभाग 9 साठी -
 
रा.काँ.- 2, भाजपा - 2, मनसे-1,शिवसेना-1 असे एकूण 6 उमेदवार,
 
प्रभाग 10 साठी - 
 
रा.काँ.- 2, भाजपा - 5, शिवसेना - 1, अपक्ष- 1 असे एकूण 9 उमेदवार,
 
प्रभाग 11 साठी -
 
रा.काँ.- 2, भाजपा - 4, शिवसेना - 1, अपक्ष- 2, असे एकूण 9 उमेदवार,
 
प्रभाग 12 साठी - 
 
रा.काँ.- 3, भाजपा - 4, शिवसेना-1, मनसे-1 असे एकूण 9 उमेदवार प्रभाग 13 साठी काँग्रेस- 2, भाजपा - 5, मनसे - 1, अपक्ष - 1 असे एकूण 9 उमेदवार,
 
प्रभाग 14 साठी - 
 
रा.काँ.- 3, भाजपा - 2, मनसे - 1 असे एकूण 6 उमेदवार,
 
प्रभाग 15 साठी -
 
काँग्रेस- 2, भाजपा - 2 असे एकूण 4 उमेदवार, प्रभाग 16 साठी रा.काँ.- 4, भाजपा - 5, अपक्ष- 4, शिवसेना- 1 असे एकूण 14 उमेदवार,
 
प्रभाग 17 साठी -
 
रा.काँ.- 2, भाजपा - 4, शिवसेना-1 असे एकूण 7 उमेदवार रिंगणात उतरले
आहे.
 
नगराध्यक्षपदासाठी सामना रंगणार ?
 
राष्ट्रवादी कॉग्रेस, काँग्रेस व आरपीआय (कवाडे) गटातर्फे क्षितिजा प्रवीण गरुड तर भाजपा तर्फे माजी सरपंचा विजया अमृत खलसे यांना पुनःश्च नगराध्यक्ष पदासाठी संधी मिळाल्याचे राजकीय गोटातील चर्चेतून बोलले जात आहे. येथे भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.