रोबोमय जीवनशैलीकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



 
 
अमेरिकेतील ड्युक विद्यापीठातील काही वैज्ञानिकांनी या कृत्रिम नाकाचा शोध लावला आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले हे नाक श्वानांपेक्षाही जलद गतीने अशा पदार्थांचा छडा लावू शकते, असा दावा वैज्ञानिकांकडून करण्यात आला आहे. 
 
 
नाक हा मानवाला, प्राण्यांमधील असा एक अवयव ज्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा कोणताही गंध ओळखणं अगदी सहज शक्य होतं. त्यातच प्राण्यांचं नाक म्हणजे तर त्यांना मिळालेली देणगीच. अनेकदा अनेक प्रकरणांचा छडा लावण्यासाठी खास प्रशिक्षित श्वानांची मदत घेतली जाते. पण, आता जसजशी तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे, तसतशी अशा प्रशिक्षित श्वानांची गरजदेखील कमी होण्याच्या मार्गावर आहे. यामागे तशी काही कारणंही आहेत. जगातील काही वैज्ञानिकांनी एका कृत्रिम नाकाची निर्मिती केली आहे. याचाच वापर करून आरडीएक्स, डीएनटी आणि अमली पदार्थांचा छडा लावणे आता सहज शक्य होणार आहे.
 

अमेरिकेतील ड्युक विद्यापीठातील काही वैज्ञानिकांनी या कृत्रिम नाकाचा शोध लावला आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले हे नाक श्वानांपेक्षाही जलद गतीने अशा पदार्थांचा छडा लावू शकते, असा दावा वैज्ञानिकांकडून करण्यात आला आहे. ड्युक विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी उंदरांच्या जीन्सपासून याची निर्मिती केली आहे. उंदरांच्या जीन्सपासून तयार केलेल्या ऑडर रिसेप्टर्सच्या आधारावर एक रोबो नोझ प्रोटोटाईप विकसित करण्यात आले आहे. यामध्ये उंदरांच्या पाच टक्के जीन्सचा वापर केल्याचाही दावा करण्यात आला आहेखरं तर कृत्रिम नाकांची संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून विचारात असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे होते. त्यातच १९९० च्या दशकात रिसेप्टर्सची ओळख पटली होती. परंतु, या सर्व रिसेप्टर्सची निर्मिती करण्यासाठी आणि आमच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक तांत्रिक अडथळे असल्यामुळे हा विचार लांबला होता. मात्र, आता तांत्रिक अडथळे दूर झाल्यामुळे कृत्रिम उपकरणांमध्ये याचा वापर सुरू करण्यात आला आहे. उंदीर भलेही छोटे असतील, परंतु त्यांच्या नाकांच्या ग्रंथी या तुलनेने जास्त सक्षम असतात.

 

मानव, श्वान आणि उंदरांमध्ये सुमारे २० हजार जीन्स असतात, जे गंध, चव, अनुभव आणि आपले शरीर ज्या ज्या गोष्टी करते त्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रथिने तयार करण्याचे निर्देश देत असतात. मानवाचा मेंदू हा उंदरांच्या मेंदूपेक्षा नक्कीच मोठा आहे. परंतु, महत्त्वाची बाब म्हणजे दोघांच्याही ओलफॅक्ट्री बल्बमध्ये असलेल्या न्यूरॉन्सची संख्या जवळपास सारखीच असते. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या या नाकाला मानवी आणि श्वानांच्या नाकाच्या तुलनेत नक्कीच काही मर्यादा असतील. परंतु, तंत्रज्ञानाच्या या मदतीमुळे कोणत्याही जिवावर अवलंबून न राहता नक्कीच सर्व बाबींचा छडा लावणे शक्य होणार आहे.

 

युनायटेड अरब अमिराती विद्यापीठानेही विद्यार्थ्यांशी संवाद साधणाऱ्या एका रोबोची निर्मिती केली आहे. हा रोबो विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टरांची गरज कमी करून मुलाचे लक्ष वेधण्यासाठी आवश्यक ते परीक्षण या रोबोंच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील संशोधक मुलांशी संवाद साधण्यासाठी बी-बॉट फ्लोर रोबोची मदत घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. याच धर्तीवर युएई विद्यापीठातही अशाच प्रकारचा रोबो विकसित करण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये असलेल्या अनेक प्रकारच्या व्यंगापासून दूर नेण्यासाठीही या रोबोची मदत घेतली जाऊ शकते. ऑटिस्टिक मुलांसह शिक्षणात रोबोट्सचा उपयोग नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. तसेच स्थिर, सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी, शिक्षणास समर्थन देण्यासाठी दृढता निर्माण करण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते. तसेच सर्व मुलांना भावनिकदृष्ट्या फायदेशीरही ठरू शकतात, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. तंत्रज्ञान नक्कीच मानवावरील भार कमी करण्यास मदत करू शकते, परंतु मानवाच्या मेंदूतूनच निघालेल्या कल्पनांच्या साहाय्याने तंत्रज्ञान विकसित होत असते. त्यामुळे मानवी मेंदूपुढे या सर्वच गोष्टींना काही मर्यादा असतात. शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या सर्व गोष्टींची कितीही मदत घेतली तरी याला मानवी जोड ही आवश्यक आहेच. आगामी काळ हा तंत्रज्ञानाचा असल्यामुळे आणखी काही नवं घडलं तरी नवल वाटायला नको.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@