तळोद्यात कपडा बँकेतील 100 ड्रेसचे गरजूंना वाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |
तळोदा
शहरातील कपडा बँकेत जमा झालेले कपडे नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रम केंद्रातील चिमूकल्यांसाठी आधार ठरनार आहे.
 
बालदिनाचे औचित्य साधत तळोदा येथील कपडा बँकेचा उपक्रम राबविणार्‍या युवकाच्या एका गृपने कपडा बँकेतील सुमारे 100 ड्रेसचे वाटप करून खर्‍या अर्थाने बालदिन साजरा केला.
 
गरीब व गरजूंसाठी तळोद्यातील संतोष माळी, पंकज शेंडे, सुकलाल जाधव, राहुल राणे, अमोल चव्हाण, दीपक जाधव, चेतन माळी, सचिन सूर्यवंशी, कार्तिक माळी या युवकांनी तळोद्यात कपडा बँकेचा उपक्रम राबविण्यात सुरूवात केली आहे.
 
कपडा बँकेच्या माध्यमातुन अनेकजण जुने कपडे गरजूंची गरज भागविण्यासाठी देत आहेत. सद्या मध्यमवर्गीय व गरीबांच्या महागाईच्या चटक्याने हाल सुरू आहेत. या उपेक्षित वर्गाला दिलासा देण्यासाठी तळोद्यातील या युवकांनी समाजाचे ऋण अदा करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून कपडा बँकेचा उपक्रम सुरू केला.
 
यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. काल बालदिनाचे औचित्य साधुन नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रमात कपडा बँकेच्या माध्यमातुन सुमारे 100 ड्रेस वाटप करण्यात आले.
 
दरम्यान हेमंत विश्वनाथ हिवरे यांनी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे 20 चादरी वाटप केल्या. तसेच विनोद पाठक यांनीही सुमारे 50 शालेय गणवेश वाटप केले. याप्रसंगी अनाथ आश्रमाचे बालकल्याण समिती सदस्य नितीन सनेर, सुरेश पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@