‘इपिक रिसर्च’मध्ये 67 विद्यार्थ्यांची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |

शिरपूरच्या आर.सी.पटेल अभियांत्रिकीतील उपक्रम

 
 
शिरपूर : येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या सिव्हील, संगणक, माहिती व तंत्रज्ञान, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन व इलेक्ट्रीकल शाखेच्या एकूण 67 विद्यार्थ्यांची इपिक रिसर्च प्रा.ली. या बहुराष्ट्रीय फायनन्शिअल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीत असोसिएट फायनन्शिअल कंन्सलटंट या पदावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.
 
पटेल अभियांत्रिकी, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. हि संपूर्ण निवड प्रक्रिया महाविद्यालयाच्या आवारात संपन्न झाली.
 
ही कंपनी फायनन्शिअल सर्व्हिस क्षेत्रात प्रोव्हायडर म्हणून ओळखली जाते. इक्विटी, कॅमोडीटी, डेरीवेटीवज आणि फोरेक्स या फायनन्शिअल क्षेत्रातील कंपनीचे ग्राहक व क्लायंटस जगातील अनेक विकसित देशातील असल्याने इपिक रिसर्च प्रा. ली. हि बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून नावलौकिकास आली आहे.
 
पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेषन, सिव्हील, संगणक, माहिती व तंत्रज्ञान, मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल शाखेच्या विद्यार्थी या कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र होते.
 
तीन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला बुद्धिमत्ता चाचणी, ग्रुप डिस्कशन, तांत्रिक मुलाखत व शेवटी एच.आर.राउंड झाला. त्यात आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या 67 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शाखानिहाय निवड झालेले विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे.
 
सिव्हील : देवदास महाले, मनीष सोनवणे, सोहेल अन्सारी, जागृती चौधरी, सूरज परदेशी, अक्षय ठाकूर, अब्दुल्ला सऊद रहेमानी, ललित मोरे, दिषा पाटील, रुपाली सपकाळे, आकाश पाटील, सुप्रिया महाजन, नेहा पाटील.
 
संगणक: उज्वल पालीवाल, आशना पुथलॉन, हर्षल पाटील, अश्विनी कासार, सिद्धार्थ वर्मा, अतुल जाधव, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेषन: मोनिका पाटील, प्रशांत जाधव, हितेश पाटील, निकेश राऊत, तेजस चव्हाण,
 
इलेक्ट्रीकल: नितेश परदेशी, राहुल बिलाडे, मुकेश महाजन, नेहा जोशी, ऋषिकेश सिसोदिया, अर्चना बोरसे, ऋशीकेश कुमावत, कल्पेश पाटील, केशव पाटील माहिती व तंत्रज्ञान: मृणाल मराठे
 
मेकॅनिकल : भावसार सिद्धेश, चौधरी देवेंद्र, चौधरी जयेश, चव्हाण सौरभ, चव्हाण कमलेश, देसले सायली, जगताप धिरज, मणियार शेख, मोरे शुभम, पाटील हितेश, पाटील कपिलकुमार, पाटील केतन, पाटील किरण, पाटील परेश, पाटील प्रसाद, पाटील प्रथमेश, पाटील सागर, पाटील योगेश, पाटील योगेश, पवार आदित्य, पिंजारी जुनेद, पिंजारी कमरुजमा, साळुंखे कपिल, श्रॉफ निहित, सोनवणे दिनेश, सोनवणे प्रतीक, सोनवणे वैशाली, सईद कसिमुद्दीन, ठाकरे ऋषिकेश, तोमर दिव्यराज, वारुडे लतेश, वाघ कीर्तिवर्धन, पिंजारी इरफान या 67 विद्यार्थ्यांची असोसिएट फायनन्शिअल कंसलटंट या पदावर वार्षिक 2.61 लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली.
 
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
@@AUTHORINFO_V1@@