भाग्यश्री मगरेंची दुबईमध्ये एचआरपदी निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2018
Total Views |

तळोदा -
येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील कन्या व मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जळगावची विद्यार्थिनी भाग्यश्री उल्हास मगरे यांची इंटरनॅशनल प्लेसमेंट होऊन दुबईच्या हॉस्पिटलमध्ये एच.आर. असिस्टंट व्यवस्थापक पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होऊन कौतुक केले जात आहे.
 
भाग्यश्री मगरे तळोद्यातील पत्रकार आणि शिक्षक उल्हास मगरे आणि नीलिमा मगरे यांची कन्या असून त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण तळोदा येथे तर जळगाव येथून बी. ई. बायोटेक केल्यावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.टेक.चे उच्चशिक्षण घेतले.
 
त्यात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. सध्या त्या मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जळगाव येथे हेल्थकेअर मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे.
 
त्यावेळी निवड प्रक्रियेत पात्र होऊन संयुक्त अरब अमिरातीत दुबई स्थित इंटरनॅशनल मॉडर्न हॉस्पिटलमध्ये एच.आर. असिस्टंट व्यवस्थापक म्हणून त्यांची निवड झाली आहे.
 
तळोदासारख्या लहानशा गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलीची इंटरनॅशनल प्लेसमेंट होऊन तिला परदेशात मोठ्या पगारावर नोकरीची संधी मिळाल्याबद्दल मिम्स जळगावचे संचालक नितीन पाटील संचालिका शैलजा पाटील तसेच शहरातील अनेकांनी भाग्यश्री यांचे कौतुक केले आहे.
 
आजोबा माजी प्राचार्य स्व.एन.सी.मगरे यांची प्रेरणा आणि माझ्या प्रत्येक पावलाला माझ्या आजीने आई-वडिलांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला. त्यांनी मला कधीही इतरांच्या वाटेने जाण्याचा आग्रह केल्याचीही प्रतिक्रिया भाग्यश्रीने दिली.
@@AUTHORINFO_V1@@