तळोद्याजवळ व्यापार्‍यांना तलवारीचा धाक दाखवून 5 लाखाने लुटले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018
Total Views |

 
तळोदा, 16 नोव्हेंबर
 
तळोदा शहरातून नंदुरबारकडे जाणार्‍या मारुती वॅगनआर (एम.एच.39, ए.बी.2198) या गाडीला दसवड फाट्याजवळ थांबवून काही अज्ञात लुटारूंनी साखरेचे व्यापारी किशोर जैन, विरलकुमार जैन, अक्षयकुमार जैन यांना तलवारीचा धाक धाकवून व मिरचीची पूड डोळ्यात फेकण्याची धमकी देत 5 ते 6 लाख रुपयांची लूट केली. तसेच सोन्याची चेन, ब्रासलेट, अंगठी असा एकूण 5 तोळे सोने असा माल चोरट्यांनी लुटून फरार झाले.
 
याबाबत असे की, तळोदा येथून नंदुरबारकडे जाणारे साखरेचे व्यापारी किशोर जैन, विरलकुमार जैन, अक्षयकुमार जैन, हे नेहमीप्रमाणे उधारीची वसुली करण्यासाठी तळोदा येथे आले होते.
 
वसुली झाल्यानंतर ते परत नंदुरबारला प्रकाशामार्गे जात असताना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास काही 10 ते 12 अज्ञात लुटारूंनी दसवड फाट्याजवळ या व्यापार्‍यांची गाडी अडवून गाडीचा काच फोडून व तलवारीचा धाक धाकवून, डोळ्यात मिरचीची पुडीचा फेकू असा धाक देत 5 ते 6 लाख रुपयांचा रोख रक्कम व 5 तोळे सोने असा रोख रकमेसह मुद्देमाल लांबविला. याबाबत तळोदा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
 
या घटनेमुळे तळोदा व नंदुरबारातील व्यापार्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गाडी लुटीची ही 5 वी घटना असून याकडे पोलिसांनी सरळ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@