साडेतीन हजार भाविकांना महाप्रसाद
जळगाव, 15 नोव्हेंबर
येथील बांभोरी नाका परिसरातील पोदार स्कूलनजिकच्या संत जलाराम बाप्पा मंदिरात संत जलाराम बाप्पा यांची 219 वी जयंती आनंद व भक्तीमय वातावरणात बुधवारी पार पडली.
दुपारी आरती आणि नंतर महाप्रसाद वितरण झाले. त्याचा सुमारे 3 -3॥ हजार भाविकांनी लाभ घेतला.जय जलाराम विश्वस्त संस्थेचे विश्वस्त आणि गुजराती समाज तसेच अन्य भाषिक भक्तगण जलाराम सत्संग मंडळ तसेच महिला मंडळांचा संगीतमय भजन सादरीकरणात उत्साहपूर्ण सहभाग राहिला. हा सोहळा दिवाळीनंंतर दरवर्षी सप्तमीला सादर होतो.
या मंदिरात प्रभू रामचंद्रांचा दरबार आणि गणपतीची वेधक, विलोभनीय मूर्ती आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.