विजेत्या संघांचा साखळी फेरीत प्रवेश

    15-Nov-2018
Total Views |

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस महिला स्पर्धा


 
जळगाव, 14 नोव्हेंबर
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सुरु झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस (महिला) स्पर्धेत उद्या गुरुवारी सकाळच्या सत्रात बाद फेरीतील सामने संपल्यानंतर या फेरीतील चार संघ साखळी फेरीत प्रवेश करतील.
 
हे चार संघ गतवर्षीच्या गुणानुक्रमे चार क्रमांकांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, राजस्थान विद्यापीठ, जयपूर, देवी अहिल्याबाई विद्यापीठ, इंदोर आणि मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्याशी खेळतील.
 
बुधवारी दुसर्‍या दिवशीच्या लढतीत 14 सामने झाले. यामध्ये गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद आणि वीर नर्मद दक्षिण विद्यापीठ, गुजरात यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून आपले वर्चस्व सिध्द केले तर मध्यप्रदेशच्या एल.एन.आय.पी.ई. विद्यापीठ, ग्वाल्हेर आणि महाराष्ट्राच्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनीही बाद फेरीतील प्रत्येकी दोन सामने जिंकून आपले आव्हान कायम ठेवले आहे.
 
यजमान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जय नारायण व्यास विद्यापीठ, जोधपूरने अटीतटीच्या लढतीत 3-2 ने पराभूत केले.
 
बुधवारी सकाळी 9 वाजता स्पर्धांना प्रारंभ झाला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुसर्‍या दिवशीच्या बाद पध्दतीतील स्पर्धा संपल्या. दुसर्‍या दिवशीची सर्वोत्तम खेळाडू कविशा शाह (गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद) ही ठरली तर काल पहिल्या दिवशीची सर्वोत्तम खेळाडू रीत झा (एल.एन.आय.पी.ई. विद्यापीठ, ग्वाल्हेर) ही ठरली होती.
 
दुसर्‍या दिवशीच्या बाद स्पर्धांमध्ये गुजरात विद्यापीठ, अहमदाबादने पहिल्या सामन्यात गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठ, अहमदाबादला तर दुसर्‍या सामन्यात महाराजा गंगासिंग विद्यापीठ, बिकानेर यांना पराभूत केले. एल.एन.आय.पी.ई. विद्यापीठ, ग्वाल्हेरने पहिल्या सामन्यात संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती यांचा तर दुसर्‍या सामन्यात सिम्बॉयसीस विद्यापीठ, पुणे या महाराष्ट्रातील दोन्ही विद्यापीठाचा पराभव केला.
 
वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाने पहिल्या सामन्यात के.एस.के.व्ही. कच्छ विद्यापीठाचा आणि दुसर्‍या सामन्यात राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूरचा पराभव केला. महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने पहिल्या सामन्यात सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोटचा तर त्यानंतरच्या सामन्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा पराभव केला.
 
उद्या गुरुवारी सकाळच्या सत्रात बाद फेरीतील सामने संपल्यानंतर या फेरीतील चार संघ साखळी फेरीत प्रवेश करतील. हे चार संघ गतवर्षीच्या गुणानुक्रमे चार क्रमांकांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, राजस्थान विद्यापीठ, जयपूर, देवी अहिल्याबाई विद्यापीठ, इंदोर आणि मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्याशी खेळतील.
 
दुसर्‍या दिवशीचे निकाल 
 
1) गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद विरुध्द गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठ, अहमदाबाद यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरात विद्यापीठाने 3-1 ने विजय प्राप्त केला.
 
2) महाराजा गंगासिंग विद्यापीठ, बिकानेरने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर अटीतटीत 3-2 ने विजय प्राप्त केला.
 
3) एल.एन.आय.पी.ई. विद्यापीठ, ग्वाल्हेर विरुध्द संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्यातील सामना देखील चांगलाच रंगला. अखेर ग्वाल्हेरने 3-2 ने विजय प्राप्त केला.
 
4) सिम्बॉयसीस् विद्यापीठ, पुणे या संघाने महर्षि दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेरवर 3-1 ने मात केली.
 
5) यजमान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जय नारायण व्यास विद्यापीठ, जोधपूर यांच्याकडून 2-3 ने पराभूत व्हावे लागले.
 
6) वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरतच्या संघाने के.एस.के.व्ही. कच्छ विद्यापीठावर 3-0 अशी एकतर्फी मात केली. 7) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने देखील राजकोटच्या सौराष्ट्र विद्यापीठावर 3-0 असा विजय प्राप्त केला.
 
8) राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर विरुध्द महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यात झालेल्या सामन्यात जबलपूर विद्यापीठाने 3-2 ने विजय प्राप्त केला.
 
9) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडने एकतर्फी 3-0 ने भक्तकवी नरसिंग मेहता विद्यापीठ, जुनागड यांच्यावर मात केली.
 
10) वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरतने पुढच्या सामन्यात देखील विजय प्राप्त केला. त्यांनी राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूरचा 3-0 ने पराभव केला.
 
11) वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरतने तिसर्‍या सामन्यात जय नारायण व्यास विद्यापीठ, जोधपूरवर 3-1 ने विजय प्राप्त केला.
 
12) एल.एन.आय.पी.ई. ग्वाल्हेर विद्यापीठाने सिम्बॉयसीस् विद्यापीठ, पुणेवर पुढच्या सामन्यात 3-1 ने मात केली.
 
13) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विरुध्द शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांमध्ये झालेल्या लढतीत शिवाजी विद्यापीठाने 3-2 ने नांदेडचा पराभव केला.
 
14) महाराजा गंगासिंग विद्यापीठ, बिकानेर विरुध्द गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद यांच्यात झालेल्या लढतीत गुजरात विद्यापीठाने 3-2 ने विजय प्राप्त केला.