मराठा आरक्षण - १ डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018
Total Views |
 

शनिशिंगणापूर : ''गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचा आरक्षणासाठी आंदोलनात्मक लढा सुरू आहे. मागासवर्गीय समितीने राज्य सरकारकडे अहवालही सादर केला आहे. येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा'', असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे दिले. अहमदनगरमध्ये शनिशिंगणापूरच्या शेतकरी-वारकरी महासंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

 

फडणवीस म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही. त्यामुळे मराठा समाजाने जल्लोष करण्यास तयार राहावे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. खऱ्या अर्थाने वारकरी व शेतकऱ्यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे. मात्र, आम्ही चार वर्षाच्या कालावधीत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५० हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली आहे. प्रत्येक अडचणीमध्ये शेतक-यांच्या पाठीमागे आमचे सरकार आहे.

 

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील शिंगणापूर येथे आगमन झाले. त्यांनी अभिषेक करून शनिचे दर्शन घेतले. देवस्थान पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, आ. गिरीश महाजन, आ. शिवाजीराव कर्डीले, आ. बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, खासदार दिलीप गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@