शुक्रवारपासून धुळ्यात ‘परिवर्तन महोत्सव’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |

अ.भा.ना.प.धुळे यादव खैरनार यांच्या स्वप्नाला देणार पूर्ण रूप

 
 
 
धुळे, 13 नोव्हेंबर
यादव खैरनार स्मृती परिवर्तन महोत्सव धुळ्यातील प्रसिद्ध रंगकर्मी स्वर्गीय यादव खैरनार यांनी धुळ्यामधील रंगभूमी समृद्ध तर केलीच पण नाटक चित्रपट दूरदर्शन अशा विविध माध्यमांमधून त्यांनी आपली एक मनस्वी अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली होती.
 
यादव खैरनार यांच्यामुळे धुळ्यातल्या रंगभूमीची ओळख महाराष्ट्राला झाली होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने खान्9देश रंगभूमीचे मोठे नुकसान झाले.
 
धुळ्यात एक कला महोत्सव सुरू व्हावा, त्यात नाटक संगीत साहित्य यांचा समावेश असावा, असे यादव खैरनार यांना नेहमी वाटायचं. पण काही अडचणींमुळे त्यांना त्यांचे हे स्वप्न साकारता आले नाही.
 
यादव खैरनार यांच्या स्वप्नाला पूर्ण रूप देण्यासाठी धुळ्यामधील अखिल भारतीय नाट्य परिषद धुळे, मानवता बहुउद्देशीय विकास संस्था, लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, मॅड स्टुडिओ धुळे या नाट्यसंस्था व खैरनार कुटुंबीय सक्रिय झाले.
 
याला जळगावमधील प्रसिद्ध नाट्यसंस्था परिवर्तन यांची साथ लाभली. या सर्व प्रयत्नांमधून धुळ्यामध्ये 16, 17 व 18 नोव्हेंबर या कालावधीत यादव खैरनार स्मृती परिवर्तन महोत्सव 2018 साकार होतो आहे.
 
परिवर्तन ही आता परिवर्तनशील व प्रयोगशील संस्था म्हणून केवळ खान्देशाला नाही तर महाराष्ट्राला सुपरिचित अशी सांस्कृतिक चळवळ झालेली आहे.
 
विविध कला महोत्सव अभिवाचन महोत्सव नाट्यमहोत्सव नाट्यनिर्मिती अशा विविध माध्यमांमधून परिवर्तन जळगाव सतत कार्यशील आहे. यामुळे आयोजकांनी परिवर्तनची निर्मिती असलेल्या विविध कलाप्रकारांचा महोत्सव आता धुळ्यात आयोजीत केला आहे.
 
जळगावमधील नाट्यसंस्थेने निर्मित केलेल्या कलाकृतीचा महोत्सव दुसर्‍या शहरात होतो आहे. हा केवळ परिवर्तनचाच नाही तर जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्राचा बहुमान आहे. असा बहुमान पण शहराला पहिल्यांदा मिळतो आहे.
 
पहिल्या दिवशी ‘नली’ या एकलनाट्याचा प्रयोग सादर होईल. श्रीकांत देशमुख लिखित नलिनी देवराव हे व्यक्तिचित्रण ज्याचं नाट्यरूपांतर शंभू पाटील यांनी केलेल आहे. योगेश पाटील यांचे दिग्दर्शन तर हर्षल पाटील अभिनित एकल नाट्य प्रयोगाने या कला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
 
दुसर्‍या दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबरला बहिणाबाईच्या कविता व गाण्यांवर आधारित संगीतमय कार्यक्रम ‘अरे संसार संसार’ सादर होणार आहे. नाट्य संगीत व साहित्य यांचा अनोखा मिलाफ या महोत्सवात करण्यात आलेला आहे.
 
या महोत्सवाचं आयोजन व्यंकटेश लॉन गरुड बाग धुळे येथे रोज सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित केला आहे. धुळ्यामधील सांस्कृतिक क्षेत्रात या महोत्सवामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
महोत्सवात यांचा सहभाग
 
परिवर्तनच्या या महोत्सवामध्ये डॉ. रेखा महाजन, सुदिप्ता सरकार, होरिलसिंग राजपूत, सोनाली पाटील, मंगेश कुलकर्णी, श्रद्धा पुराणिक, उदय सपकाळे, भूषण गुरव, जयश्री पाटील, अक्षय गजभिये, अंजली हांडे, अभिषेक पाटिल, हर्षदा कोल्हटकर, मनीष गुरव, अनुषा महाजन, हर्षदा पाटिल, मोना तडवी, निखिल क्षीरसागर, सुनील बारी, हे कलावंत सहभागी आहेत.
 
तर या महोत्सवाच्या यशस्वितेसाठी वसंत गायकवाड़, राजू बाविस्कर, ज्ञानेश्वर शेंडे, विकास मल्हारा, नितिन सोनवणे, विशाल कुळकर्णी, राहुल निंबाळकर, रश्मी कुरंभट्टी, मानसी जोशी, सुनीता दप्तरी, मनोज पाटील, डॉ. किशोर पवार, प्रीती झारे, योगेश चौधरी, शशिकांत महानोर, प्रतीक्षा कल्पराज, मिलिंद जंगम, अक्षय नेहे, उदय ऐशे, मुकेश पवार, संदीप केदार हे परिवर्तनचे कलावंत प्रयत्नशील आहेत.
@@AUTHORINFO_V1@@