कृषी विभागाच्या योजनांसाठी ‘सोडतचिठ्ठीने’ लाभार्थ्यांची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |
धुळे : उन्नत शेतकरी समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 2018- 2019 अंतर्गत ट्रॅक्टर व औजारे व फलोत्पादन या घटकांसाठी संबंधित तालुकास्तरावर तालुका, योजना, प्रवर्ग, घटकनिहाय चिठ्ठी पध्दतीने ज्येष्ठता यादी करीता सोडत काढण्यात येणार आहे, असे उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
 
समितीच्या निर्देशानुसार ही सोडत काढण्यात येईल. शेतकर्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
सोडतीचे नियोजन असे : शिरपूर, 15 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शिरपूर. धुळे, 16 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, धुळे. शिंदखेडा, 17 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शिंदखेडा. साक्री, 19 व 20 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री.
@@AUTHORINFO_V1@@