नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याने काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. आक्षेपार्ह विधानामुळे त्या सध्या सोशल मीडियावर टीकेच्या धनी बनत आहेत. त्याचबरोबर लखनऊ पोलिसांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लोकार्पण सोहळ्यातील पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो दिव्या यांनी ट्विटरवर शेअर केला होता. या फोटोच्या खाली त्यांनी Is that bird dropping? असा आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध अशा प्रकारचे ट्विट केल्याने सर्व स्थरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्याच बरोबर लखनऊ पोलिसांनी त्यांच्याविरोधात आयटी ऍक्ट ६७ व आईपीसी १२४ A अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
Ummm no, it is the values of the Congress that are dropping.
— BJP (@BJP4India) November 1, 2018
Historical disdain for Sardar Patel + Pathological dislike for @narendramodi = Such language.
Clearly, @RahulGandhi’s politics of 'love'! https://t.co/1TPCY7Fs4d
दिव्या यांच्या या आक्षेपार्ह ट्विटनंतर भाजपने देखील खरपूस समाचार घेतला. भाजपाच्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डलवरून दिव्या यांचं ट्विट रिट्विट करत काँग्रेच्या मूल्यांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. या ट्विट मध्ये भाजपाने म्हटले की, "नाही... काँग्रेस पक्षाचे मूल्य खाली सांडत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरून वाद निर्माण करणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सुडाचे राजकारण करणे. हेच राहुल गांधी यांचे प्रेमाचे राजकारण आहे का?"
Sigh! Bird brains will only see bird droppings!! @divyaspandana https://t.co/BBs9kRdIZp
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) November 1, 2018
दिव्या यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियामध्ये दिव्या, काँग्रेस व राहुल गांधी यांची चांगलीच खिल्ली उडवली गेली. त्यामुळे आता राहुल गांधी दिव्या यांच्या आक्षेपार्ह ट्विटवर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Congress sources say the party does not approve of this language used by Divya Spandana against the PM. Party should come on record. Once again, language used marks a low level in our politics https://t.co/ZrlRerjETx
— Nidhi Razdan (@Nidhi) November 1, 2018
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/