भारतात 'एक लाख' मुलांचा मृत्यू ; 'हे' आहे कारण...

    30-Oct-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. यातून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे,. WHO च्या या अहवालानुसार भारतात प्रदूषण आणि विषारी वायूमुळे २०१६ या एका वर्षात १ लाख १ हजार ७८८ मुलांचा मृत्यू झाला आहे. प्रदूषण आणि विषारी वायूचा सर्वाधिक परिणाम पाच वर्षांखालील मुलांवर झाल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.

 

WHO ने वायू प्रदूषण, बाल आरोग्य आणि स्वच्छ हवा नावाचा एक अहवाल सादर केला आहे. या नुसार दारिद्र्यरेषेखालील अणि मध्यमवर्गीय देशांमध्ये पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या ९८ टक्के मुलांना वायू प्रदूषणाने श्वासोश्वासाच्या समस्या निर्माण होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तर भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी २० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
 
 

जगातील अन्य देशांच्या तुलनेत वायू प्रदूषणामुळे भारतात सर्वाधिक मुलांचा मृत्यू होतो. असेही या अहवालात म्हटले आहे. स्वयंपाक घरातून निर्माण होणारे वायू आणि घराबाहेर होणारे वायू प्रदूषण याचा मुलांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम झाल्याने या अहवालातून उघडकीस आले आहे. भारताच्या राजधानीत होणाऱ्या वायू प्रदूषणावर देखील WHO ने चिंता व्यक्त केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/