विहिरीत पडल्याने तीन महिलांचा मृत्यू

    03-Oct-2018
Total Views |


 

मुंबई : विलेपार्ले परिसरात विश्वकर्मा समाजातील महिला भाविक पूजा करताना विहिरीचा स्लॅब तुटून विहिरीत पडल्या. यामधील बुडून तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सात महिलांना वाचवण्यात यश आले असून विहिरीत आणखी काही महिला भाविक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

विलेपार्ल्यातील शिवसागर हॉटेलच्या मागील भागात दीक्षित रोडवर असलेल्या विहिरीत महिला बुडाल्या आहेत. कुंकूवाडी भागात राहणाऱ्या विश्वकर्मा समाजातील महिला पूजेसाठी विहिरीजवळ गेल्या होत्या. पूजा सुरू असताना संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास स्लॅब तुटल्यामुळे 17-18 महिला विहिरीत पडल्या असे स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख नितीन डिचोलकर यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे जवान, महापालिका प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पाणी उपसण्याचे काम सुरू असून आणखी काही महिला विहिरीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/