लैंगिक छळाच्या आरोपांची टाटा सन्सकडून दखल

    29-Oct-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली : वित्तीय सल्लागार सुहेल सेठ याच्यासह टाटा सन्सने केलेला करार रद्द केला आहे. मी टू मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे त्याच्याशी ३० नोव्हेंबरनंतर कोणतेही व्यवहार करणार नसल्याचे टाटा सन्सने म्हटले आहे.

 

टाटा समुहाचा कार्यभार सांभाळणारी टाटा सन्सने लैंगिक छळाच्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. सोशल मीडियावर सुरू झालेल्या मी टू चळवळीनंतर तीन महिलांनी सेठ याच्याविरोधात आरोप केले होते. तिन्ही महिलांनी सारखेच आरोप केल्यामुळे सेठ याच्याविरोधातील संशय आणखी बळावला आहे.
 
 
टाटा समुहाने सेठ याच्या कंपनीला महिन्याभराची नोटीस पाठवून करार रद्द केल्याचे सांगितले आहे. सेठ याच्याविरोधात मॉडेल डायंड्रो सोरेस, सिनेनिर्माती नताशा राठोड, लेखिका इरा त्रिवेदी यांच्यासह अन्य तीन महिलांनी तक्रार केली आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर टाटा समुहाने करार रद्द केला आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/