महानगरपालिकांनी शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2018
Total Views |



१८ व्या महापौर परिषद उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं आवाहन


नागपूर : १८ व्या महापौर परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्यावतीने वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र (वनामती), नागपूर येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील महापौर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिकांनी शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, “पुढील दहा-वीस वर्षात जगाचे तापमान दोन डिग्रीने वाढणार असून त्याचा परिणाम जीवसृष्टी, दुष्काळ व पाणीटंचाई या रुपाने दिसेल. या संकटावर मात करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणारी व्यवस्था उभी करावी लागेल. शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील सांडपाणी व दळणवळण व्यवस्था शहरांना प्रदूषित करणारी ठरणार आहे. यासाठी घणकचरा व्यवस्थापन व सीव्हरेजचे विकेंद्रीकरण गरजेचे आहे. महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करुन शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा."

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि जहाज बांधणी, जलसंपदा, जलस्त्रोत मंत्री नितीन गडकरी होते. महापौरांना जादाचे अधिकार मिळायला हवा, मात्र या अधिकाराचा वापर शहर विकासासाठी व्हावा असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर महानगरपालिकांमध्ये विकास आराखडे मंजूर होण्यास लागणाऱ्या विलंबावर गडकरींनी नाराजी व्यक्त केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@