श्रीनगर : भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला चांगलाच दम भरला आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या दगडफेकीदरम्यान जवान राजेंद्र सिंह शहीद झाले होते. याप्रकरणाची गंभीर दखल घेत लष्करप्रमुख यांनी पाकिस्तानला इशारा दिला.
काश्मीर मध्ये बीआरओचे पथक रस्ते बांधणीचे काम करत असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकी दरम्यान जवान राजेंद्र सिंह शहीद झाले. “बीआरओचे पथक रस्ता बांधणीचे काम करत होते. त्यांच्या संरक्षणार्थ काही जवान तैनात करण्यात आले होते. या जवांनावर दगडफेक करण्यात आली. यादरम्यान एक जवान शहीद झाला. तरीही काही लोक म्हणतात की दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊ नका.” असे वक्तव्य करत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले. मग दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक का देऊ नये? असा प्रश्न लष्करप्रमुखांनी यावेळी उपस्थित केला. तसेच याप्रकरणी आम्ही एफआयआर दाखल केली आहे. असेही ते म्हणाले.
“पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत. याची परिपूर्ण जाणीव स्वत: पाकिस्तानलादेखील आहे. दहशतवाद हा पाकिस्तानसाठी सतत वाद चिघळत ठेवण्याचा मुद्दा आहे. काश्मीरमधील विकास रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे. वेगवेगळ्या ऑपरेशन्सद्नवारे त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल”. असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/