स्क्रिनटच की पुस्तके???

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2018   
Total Views |
 
 

ज्ञान मिळवण्याची साधने? या प्रश्नावर खंडच्या खंड लिहिले जातील. पण ज्ञान मिळवण्यासाठीचा पारंपरिक आणि आजही टिकून असलेला सन्माननीय मार्ग म्हणजे पुस्तक. नुकताच १५ ऑक्टोबर रोजी डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थवाचक दिनही साजरा झाला. वाचन चळवळ रूजावी, वाढावी यासाठी बरेच प्रयत्नही होत आहेत. ’पुस्तक हा माणसाचा खरा मित्रहा सुविचारही लोकप्रिय आहेच.

 

अर्थात सणामागून सोहळे तसे वाचक दिनानंतर तब्बल एका आठवड्याने वाचनाच्या आणि पुस्तकांच्या महत्त्वावर इथे का काथ्याकूट चालला आहे, असा विचार मनात येऊ शकतो. तर ते यासाठी की, माणूस कोणत्याही देशाचा असो कोणत्याही पदावर असो किंवा स्तरावर असो, त्याने आपल्या आपल्या पातळीवर ज्ञानवृत्ती जोपासायला हवी. पुस्तकं याकामी मोठी मदत करत असतात. मग ती मनोरंजनात्मक असू देत की शाळेतल्या अभ्यासक्रमाची. पुस्तकांना आपण चिंतनशीलपणे वाचले पाहिजेच. अभ्यासक्रमाची पुस्तके मनापासून वाचली का पाहिजेत? तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणून एक नुकताच घडलेला किस्सा. यामुळे जगभरात मनोरंजन झाले. जगभरात पाण्याचे वैज्ञानिक सूत्र शिकवले जाते. पाण्याचे सूत्र काय बरं? तर बाकी काही लक्षात राहो ना राहो पण पाण्याचे सूत्र लक्षात राहते. एचटूओ. कारण अभ्यासाच्या पुस्तकात ते लिहिलेले असते आणि गंभीरपणे आपण ते वाचलेले असते, पण स्वतःला अतिशहाण्या समजणार्या देशाच्या मुख्य न्यायाधीशाने पाण्याचे वैज्ञानिक सूत्र एचटूओ म्हणता एचटूझिरो म्हटले तर? आश्चर्यासोबत किती तरी विचार मनात येतील ना? जसे की, न्यायाच्या कलमांचा अर्थ हे न्यायाधीशमहाशय त्यांच्या मनाला भावेल असाच लावत असतील वगैरे वगैरे. या एचटूझिरोचा किस्सा नुकताच घडला पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश मियाँ साकिब निसार यांनी सांगितलेला पाण्याचा फॉर्म्युला होता एचटूझिरो. अर्थात पाकिस्तानचे नाव घेतल्यावर मनात येतेच की, जशी माती तशी मती. हे न्यायाधीश पाकिस्तानातच शोभू शकतात.

 

हा किस्सा सांगण्याचा खटाटोप यासाठी की, व्यक्तीने पुस्तकं मग ती कोणतीही असू देत विचारपूर्वक वाचावीत, त्यातून धडा घ्यावा, शिकावा. असो, आता कुणी म्हणेल की ज्ञान मिळवण्यासाठी, शिकण्यासाठी आणि मनोरंजनासाठीही पुस्तक वाचणे काही आजच्या जगात गरजेचे नाही. पुस्तक आता कुणी वाचत नाहीत. संगणकावर तर सोडाच आता जवळच्या स्क्रिनटच मोबाईलवर निमिषार्धात आपल्याला हवी ती माहिती मिळते. कुठल्याही घटनेच्या किंवा कोणत्याही गोष्टीच्याबाबतचा मागचापुढचा सर्व संदर्भ आपल्याला एका सर्चवर मिळतो. मग पुस्तकं का वाचायची? डिजिटलायझेशनचा जमाना आहे. कित्येकजण असेही म्हणतील की, पुस्तकांचं जग काही वर्षात संपेल हो. पण नुकत्याच एका घटनेने पुन्हा पुस्तकांची ज्ञानमय जादू आणि त्या दुनियेचे अमरत्व मनात फुलून गेले. घटना आहे कॅलिफोर्नियाची. घटनेतील नायक आहे झुकेरबर्ग. झुकेरबर्ग यांना मॅक्स आणि अगस्त नावाच्या दोन मुली आहेत. त्यांच्या मुलीच्या मते तिचे वडील मार्क हे पुस्तकांच्या दुकानात काम करतात. त्या मुलीला असे वाटले, कारण तिचे वडील मार्क मुलींना घेऊन दररोज पुस्तकांच्या दुकानात आणि ग्रंथालयात जातात. आता नव्या युगातले फेसबुकधारी, गुगलवारी करणारे नक्कीच म्हणतील की, मार्क झुकेरबर्गने इतका वेळ ग्रंथालयात जाण्यायेण्यामध्ये घालवण्यापेक्षा फेसबुक-गुगल वापरायचे होते ना? पण हा मार्क झुकेरबर्ग कोण आहे, हे कळल्यावर हा विचार तत्काळ आश्चर्यात बदलून जाईल. हे मार्क झुकेरबर्ग आहेत फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग. त्यांचा समावेश फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत १३ व्या स्थानी करण्यात आला आहे. जुलै २०१८ मध्ये झुकेरबर्गची एकूण संपत्ती ६७.७ अब्ज डॉलर इतकी होती. या मार्क झुकेरबर्गला पुस्तकांची महती पटली आहे. या पुस्तकांनी त्याचे जीवन आणि विचार समृद्ध केले आहेत. त्यामुळेच हे जग सुंदर करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे झुकेरबर्ग याने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर म्हटले होते. तर, आम्ही फेसबुकचे ९९ टक्के समभाग पुढील पिढीच्या भवितव्यासाठी देऊ, असे त्याने दुसर्या मुलीच्या जन्मानंतर जाहीर केले होते. संवेदनशील समाजशीलतेची समृद्धी असलेला झुकेरबर्ग आपल्या मुलींचे जगणे समृद्ध आणि ज्ञानमय व्हावे म्हणून इंटरनेटच्या जाळ्यावर विसंबून नाही तर तोही साधक होतो पुस्तकांचा, ग्रंथालयाचा. त्यामुळे स्क्रिनटच मोबाईलबरोबर मनविचार समृद्ध करणार्या पुस्तकांनाही जपले पाहिजे, वाचले पाहिजे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@