जायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |



औरंगाबाद: जायकवाडी धरणामध्ये वरच्या धरणांतून त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी सूचना जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिली. त्यानंतर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचे आदेश दिले. यामुळे जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व खोऱ्यातील जलाशयामधून जवळपास ९ टीएमसी पाणी येणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ही कार्यवाही करण्यात आली.

 

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची कार्यवाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ सुरु करा, असे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला सोमवारी सुनावले. त्यानंतर जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व खोऱ्यातील जलाशयांतून जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले.

 

कोणत्या धरणातून किती पाणी सोडण्यात येणार ?

 

>मुळा        १.९० टीएमसी

>प्रवरा        ३.८५ टीएमसी

>गंगापूर       ०.६० टीएमसी

>दारणा       २.०४ टीएमसी

>पालखेड समुह ०.६० टीएमसी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@