चोपड्यात ब्रह्मोत्सवाची सांगता आज शिवाजी चौकात रथाचा मुक्काम

    21-Oct-2018
Total Views |

चोपड्यात ब्रह्मोत्सवाची सांगता
 
आज शिवाजी चौकात रथाचा मुक्काम
 

चोपडा, २० ऑक्टोबर
येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या श्री बालाजी महाराजांच्या ब्रम्होत्सवाची रथोत्सवाने सांगता होणार आहे. या वहनोत्सव व रथोत्सवाला सुमारे साडे पाचशे वर्षांची मोठी परंपरा आहे. श्री बालाजींचा रथ आज छत्रपती शिवाजी महाराज चौकांत भाविकांच्या दर्शनार्थ मुक्कामी राहणार आहे.
 
प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत बालाजी महाराजांनी विविध वाहनांवर शहराची भ्रमंती केल्यानंतर आश्विन एकादशीला निघणारा रथ दुपारी साडे बारा वाजता गोलमंदिरा जवळून प्रवासाला निघाला. प्रारंभी व्यंकटेश बालाजी संस्थानचे पूजेचे मानकरी विक्रमसिह देशमुख, जितेंद्र वाघ यांच्या हस्ते रथाची विधीवत पूजा करण्यात आली. पौरोहित्य सुनिल नाईक व प्रमोद पाठक यांनी केले. संस्थानतर्फे रथासाठी परिश्रम घेणार्‍या विविध कामांचे मानकरी व मोगरीवाले मनोहर माळी, पांडुरंग चौधरी, युवराज पारधी, चेतन लोहार, बळीराम अवचित, कैलास लोहार ,महेश लोहार, संजय लोहार आदींचा सत्कार संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पंच आनंदराव देशमुख, प्रवीण गुजराथी आदींच्या हस्ते करण्यात आला.तसेच तहसीलदार दिपक गिरासे,पो.नि.किसन नजन पाटील यांचाही सत्कार करण्यात
आला.
यानंतर श्री बालाजी महाराजांच्या जय घोषात हजारो भाविकांनी आपल्या हस्ते रथ ओढण्यास प्रारंभ करण्यात आला. रथ आशाटॅाकीज मार्गाने चोपड्याचे ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिरावर जाणार आहे. त्याठिकाणी तिसर्‍या प्रहराची पूजा व श्री बालाजींची आंघोळ झाल्यानंतर रथरस्ता, पाटील दरवाजा मार्गाने शिवाजी चौकात मुक्कामी येईल. यावेळी नगराध्यक्षा मनिषा चौधरी, उद्योगपती आशिष गुजराथी, पीपल्स बॅक चेअरमन चंद्रहास गुजराथी, नगरसेवक जीवन चौधरी, गजेंद्र जायसवाल,भुपेंद्र गुजराथी,अश्विनी गुजराथी ,शेतकी संघाध्यक्ष शेखर पाटील,राष्ट्वादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रफुल्ल गुजराथी, गिरिष गुजराथी, प्रवीण गुजराथी, लाला गुजराथी, किरण गुजराथी, संजय कानडे,नितीन काबरा,प्रसन्न गुजराथी,पालिकेचे राजेंद्र बाविस्कर, रवींद्र जाधव, महेंद्र पाटील आदी उपस्थित
होते.
 
यात्रेवर दुष्काळाचे सावट
सालाबादाप्रमाणे येणार्‍या यात्रेत नेहमी प्रचंड गर्दी होते.परंतु यंदा कमी पडलेला पाऊस व दुष्काळाची काळी छाया असल्याने
यात्रेवर त्याचा परिणाम दिसून येत होता. विविध प्रकारची दुकाने विक्रेत्यांनी लावली असली तरी जनतेत अनुत्साह जाणवत होता. तथापि रात्री सहा वाजेनंतर भाविकांनी शिवाजी महाराज चौकात रथारुढ श्री बालाजी महारांजांचे दर्शन घेतले.