देशाचे नाव बदलणे आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018   
Total Views |

 

 

 
 
 
सध्या जगाच्या पाठीवर एका देशाने मात्र आपले नाव बदलण्यासाठी जनतेचा कौल रविवारी आजमावला. या देशावर ही वेळ अगदी स्वखुशीने आलेली नाही की या देशावर इतर कुठल्या राष्ट्राने आपला अधिकारही सांगितलेला नाही; पण तरीही या देशाने काळजावर दगड ठेवत आपले नाव बदलण्याचा....त्यामध्ये एका शब्दाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. 
 
असं म्हटलं जातं की, ‘नावात काय आहे?’ पण, या नावावरून चक्क खून पडल्याची, युद्ध उफाळून आल्याचीही इतिहासात उदाहरणे आहेतच की... त्यातच सारखी नावे असल्याने उडणाऱ्या गडबड-गोंधळाच्या गोष्टीही आपण अधूनमधून वाचत असतोच. पण, आता नाव म्हटलं की ते कुठे ना कुठेतरी सारखे असणारच. अमुकतमुक नावाची जगभरात प्रत्येकी एकच व्यक्ती असे असेलही, पण अशांची संख्या नगण्यच. कारण, ‘हर नाम कुछ कहता है।’ नावावरून त्या-त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, सामाजिक प्रतिमा-प्रतिष्ठा ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आकारास येते. जसे की, हिमालय जर एखाद्या मुलाचे नाव असेल, तर त्याचे व्यक्तिमत्त्व अगदी हिमालयासारखे उत्तुंग, ताकदीचे असेल, अशी किमान अपेक्षा तरी केली जाते. या नावाचा त्या व्यक्तीच्या एकूणच जडणघडणीवर, मेंदूच्या, मनाच्या कोपऱ्यात साहजिकच परिणाम होत असतो.... तर अशी ही नाममहती. जसे प्रत्येकाला आपले नाव प्रिय असते, तर मग देशाच्या नावाविषयीची संवेदनशीलता आपण समजूच शकतो. पण, सध्या जगाच्या पाठीवर एका देशाने मात्र आपले नाव बदलण्यासाठी जनतेचा कौल रविवारी आजमावला. या देशावर ही वेळ अगदी स्वखुशीने आलेली नाही की या देशावर इतर कुठल्या राष्ट्राने आपला अधिकारही सांगितलेला नाही; पण तरीही या देशाने काळजावर दगड ठेवत आपले नाव बदलण्याचा....त्यामध्ये एका शब्दाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
 

नावात बदल करण्यात येणाऱ्या या देशाचे नाव आहे मॅसिडोनिया. ग्रीसच्या उत्तरेला वसलेला हा २०-२१ लाख लोकसंख्येचा देश. १९९१ साली सोव्हिएत युनियनचे विभाजन झाले आणि युगोस्लाव्हिया या देशापासून प्रजासत्ताक मॅसिडोनिया जागतिक पटलावर आला. १९९३ साली या देशाला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्वही मिळाले. पण, या देशाचा युरोपियन युनियन, ‘नाटो’मधील प्रवेश मात्र वर्षानुवर्षे रखडला. त्याचे कारण एकच. या देशाच्या नावाचे ग्रीसमधील मॅसिडोनिया प्रांताच्या नावाशी असलेले साधर्म्य. कारण, दोन्ही देशांच्या इतिहासानुसार, अॅलेक्झांडरचे मॅसिडोनिया साम्राज्य आजच्या मॅसिडोनिया आणि ग्रीसला व्यापून होते. पण, ग्रीसला त्यांच्याच प्रांताच्या नावाचा स्वतंत्र शेजारी देश आधीपासूनच नामंजूर होता. १९९१ पासून अनेक वादविवाद झाले. वाटाघाटींचे प्रयत्नही झाले. अखेरीस जून २०१८ मध्ये ‘प्रेस्पा करारा’नुसार मॅसिडोनियाने त्यांच्या नावापुढे ‘उत्तर’ या शब्दाचा समावेश करून ‘रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅसिडोनिया’ असे नामकरण करण्याची तयारी दर्शविली. त्यासाठीचे रविवारी जनमतही घेण्यात आले. त्याचे निकालही जाहीर झाले आहेत. त्या निकालांनुसार, ९३ मतदान केंद्रांवर केलेल्या मतमोजणीनुसार ९१.१ टक्के नागरिकांनी नावबदलाच्या बाजूने कौल दिला आहे, तर ५.७ टक्के नागरिकांनी या निर्णयाच्या विरोधात जनमत दिले. त्यामुळे मॅसिडोनियाच्या जनतेनेही या नामबदलाला मोठ्या मनाने स्वीकारून विकासासाठी, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मतदान केले आहे, असेच म्हणावे लागेल. आता या देशाच्या संसदेत हा ठराव मंजूर केला जाईल आणि नामबदलाचा मार्ग मोकळा होईल.

 

परंतु, केवळ आणि केवळ ग्रीसमधील प्रांताच्या नावाच्या सारखेपणामुळे मॅसिडोनिया देशाला १९९१ पासून काहीशी सापत्न वागणूक मिळाली. युरोपातील एक गरीब देश असलेल्या मॅसिडोनियाला युरोपियन युनियनमध्ये, ‘नाटो’चे सदस्यत्व या वादामुळे आणि ग्रीसच्या आडमुठेपणामुळे सातत्याने नाकारण्यात आले. पण, आता या देशाला अशा विविध जागतिक संस्थांच्या सदस्यत्वाचे दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे मॅसिडोनियाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार असून रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेतमॅसिडोनियावासीयांसाठी ही खूप मोठी उपलब्धी मानली जात असून जनमताने नावबदलासाठीचा दिलेला हा कौल एका अर्थाने मॅसिडोनियाचा पुनर्जन्मच ठरला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@