अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा ‘प्रवास’

    18-Oct-2018
Total Views | 18

 


 
 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे हे दोघे दिग्गज कलाकार पहिल्यांदाच मराठी सिनेमात प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहेत. तसेच विक्रम गोखले, रजत कपूर आणि शशांक उदारपूरकर हे कलाकारही या सिनेमात दिसणार आहेत. नुकताच या सिनेमाचा मुहूर्तसोहळा पार पडला.
 

प्रवासच्या निमित्ताने एक वेगळ्या प्रकारची भूमिका साकारायला मिळाली, प्रवास हा सिनेमा प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती देईल. असे अभिनेते अशोक सराफ यांनी याप्रसंगी म्हटले. तसेच बऱ्याच काळानंतर मराठी सिनेसृष्टीत काम करायला मिळाल्याबद्दल पद्मिनी कोल्हापूरे यांनी आनंद व्यक्त केला. ‘जे शेष आहे तेच विशेष आहे’ असे प्रवास हा सिनेमा सांगतो. प्रवास सिनेमाच्या निमित्ताने मला सिनेसृष्टीतल्या या दिग्गजांबरोबर काम करायला मिळाले. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. असे दिग्दर्शक शशांक उदारपूरकर यांनी म्हटले. कला क्षेत्रात प्रवास करण्याची माझी इच्छा या सिनेमाच्या निमित्ते पूर्ण झाली. असे म्हणून निर्माते ओम छंगानी यांनी कलाकांराचे आभार मानले. सलीम-सुलेमान या हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडीने प्रवास सिनेमाला संगीत दिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

'सावली'तील घरे सेवा निवासस्थानच ! महाविकास आघाडीचा चुकीचा पायंडा महायुतीकडून मोडीत,सेवानिवासस्थानांच्या बदल्यात अधिकाऱ्यांना मालकी निवासस्थान नाही

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात 'सावली' या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीडीडीचाळ परिसरातील इमारतीत सेवानिवासस्थानात वास्तव्यास असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनाही स्वस्तात घरे देण्याबाबतचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय महायुती सरकारने रद्द केला आहे. "याप्रमाणे मागण्या मान्य केल्यास पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होणार नाहीत तसेच सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवासस्थाने उपलब्ध होणार नाहीत", असे निरीक्षण राज्य सरकारने हा जीआर रद्द करतेवेळी नोंदविले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121