केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा

    17-Oct-2018
Total Views |
 
 

 
नवी दिल्ली : लैंगिक छळाचा आरोप झाल्याने केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी गुरुवारी दुपारी अखेर पदाचा राजीनामा दिला. परराष्ट्र मंत्री अकबर नायजेरिच्या दौऱ्यावर असताना भारतात लैंगिक छळ झालेल्या प्रकरणांना वाचा फोडणारे # मी टू प्रकरण जोर धरत होते. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यापासून सुरू झालेल्या या वादामुळे बॉलीवूड, राजकारण आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींविरोधात तक्रारी पुढे येऊ लागल्या होत्या.
 
 

मोबासर जावेद अकबर हे पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आहे. पत्रकार प्रिया रमाणी यांनी एशियन एजचे संपादक असताना अकबर यांनी छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, अकबर विदेशातून परत आले आणि त्यांनी सगळे आरोप फेटाळत मानहानीचा दावा केला आहे. माझ्याविरोधात होणाऱ्या आरोपांबाबत न्यायालयीन लढा देणार असल्याचे अकबर म्हणाले. त्यामुळेच परराष्ट्र मंत्रालय पदाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशसेवेची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

 
 

       माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/