शेळ्यांचा असाही वापर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018   
Total Views |

 


 
 
 
जगभरातील विविध देशांत जंगलांना लागणारे वणवे ही आजमितीस एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. पोर्तुगालमध्येही वणव्यांचा फटका बसतो. मात्र त्यावर पोर्तुगालने नामी शक्कल लढविली आहे. आता तेथील सुमारे ३७० शेळ्यांना वणवा रोखण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे. अतिशय खर्चात या वणव्यांना प्रतिरोध निर्माण करण्याची पोर्तुगाल सरकारची ही योजना आहे.
 
 
 
आजमितीस जगातील वनसंपदा ही मुख्यत्वे दोन कारणांमुळे धोक्यात येत असल्याचे दिसून येते. १) भरमसाट वाढणाऱ्या लोकसंखेच्या गरजा भागविण्यासाठी करण्यात येणारी वृक्षतोड आणि त्या अनुषंगाने होणारे आयुद्योगीकीकरण. २) नैसर्गिक कारणांमुळे वनसंपदेला लागणारा वणवा. या वणव्यामुळे जंगल जाळून खाक होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
 

जगभरातील विविध देशांत जंगलांना लागणारे वणवे ही आजमितीस एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. वणवा ही एक नैसर्गिक आपत्ती असल्याने ती कधी ओढवेल, यांची काही समयनिर्धारता नाही. फक्त ते घडू नये यासाठी काळजी घेणे हेच काय ते आपल्या हाती आहे. अमेरिकेच्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये यावर्षी लागलेल्या वणव्यामुळे जंगलांचे आणि तेथील रहिवासी नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळालेपोर्तुगालमध्येही या वणव्यांचा फटका बसतो. मात्र त्यावर पोर्तुगालने नामी शक्कल लढविली आहे. आता तेथील सुमारे ३७० शेळ्यांना वणवा रोखण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे. अतिशय खर्चात या वणव्यांना प्रतिरोध निर्माण करण्याची पोर्तुगाल सरकारची ही योजना आहे. पोर्तुगाल या देशात उन्हाळ्यामध्ये ठिणग्या पडून डोंगराळ प्रदेशात जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटना कायम घडतात. लागलेली आग विझविण्यासाठी आणि तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचारी यांना तैनात करावे लागते. गतवर्षी लागलेल्या एका वणव्याच्या घटनेत सुमारे १०० पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडल्याची घटना तेथे घडली होती. तसेच, त्यावेळी पोर्तुगाल सरकार आणि अग्निशमन दल यांच्यातील ताळमेळाअभावी गोंधळदेखील उडाला होता.

 

यावर उपाय म्हणून आता सरकार एका जंगलातील आग दुसऱ्या जंगलात पसरू नये यासाठी ३७० शेळ्यांचा वापर करणार आहे. याचे कंत्राट घेणाऱ्या नागरिकास पुढील पाच वर्ष मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘सेरा द एस्त्रेला’ या पर्वतरांगांच्या परिसरात सुमारे ५० हेक्टर जमिनीवर शेळ्यांसह भ्रमंती करावी लागणार आहे. जेणेकरून या परिसरातील गवत त्या शेळ्या फस्त करतील. या मोहिमेसाठी देशभरातील ४० शेळीपालकांना विविध ठिकाणी पोर्तुगाल सरकारने जागा नेमून दिल्या आहेत. हा दूरगामी प्रयोग असल्याने सध्या तत्काळ या प्रयोगाचे यश जरी समोर येणार नसले तरी पुढील पाच वर्षांत या प्रयोगाचे परिणाम दिसून येतील, असे पोर्तुगाल सरकारचे म्हणणे आहे. पर्वतराजींत असणाऱ्या तीव्र उताराच्या जागी कोणत्याही यंत्रसामग्रीपेक्षा या शेळ्या जास्त परिणामकारक कार्य करू शकतात, असे येथील शासनाचे म्हणणे आहे. याकामी पोर्तुगाल सरकार या शेळीपालकांना पहिल्या वर्षी प्रत्येक हेक्टरमागे १२५ युरो म्हणजेच १४४ डॉलर इतका पगार अदा करणार आहे, तर पुढील चार वर्ष प्रती हेक्टर २५ युरो इतका मोबदला देणार आहे. तसेच, या शेळ्यांच्या दूध, मांस, चीज यावर त्या शेळीपालकाचाच हक्क असणार आहे, असे पोर्तुगाल सरकारचे धोरण आहे.

 

या डोंगराळ भागातील रहिवाशांनी वणव्याच्या भीतीपोटी येथून केव्हाच पलायन केले आहे. मात्र काही ज्येष्ठ नागरिक येथे आजही वास्तव्यास आहेत. ते आनंदाने या योजनेचा स्वीकार करत कार्य करत आहेत. त्यांच्या घरातील महिला शेळीच्या दुधापासून चीज बनवून त्याची विक्री करत आहेत. गेल्या वर्षीच्या दुर्घटनेनंतर यंदाचा उन्हाळा येथे फारच चांगला गेला. यावर्षी आग लागण्याच्या फारच तुरळक घटना येथे घडल्या आणि दरवर्षीपेक्षा ६० टक्के कमी नुकसान झालेअत्यंत सोप्या पद्धतीने पोर्तुगाल सरकारने आखलेली ही योजना खरोखरच उत्तम आहे, असे म्हणावे लागेल. या योजनेच्या माध्यमातून त्यांनी रोजगारदेखील उपलब्ध करून दिला आहे. तसेच, मागच्या वर्षीच्या घटनेतून वेळीच योग्य तो बोध घेऊन सुयोग्य नियोजन करण्याची पोर्तुगाल सरकारची मानसिकता यातून दिसून येते. काही देश कितीही घटना घडल्या तरी कोणताही बोध न घेता आपले कोणतेही धोरण आखत नाहीत. जे झाले त्यावर केवळ चर्चा करण्यात आणि गणपत वाण्यासारखे कल्पनाविश्वात रमून मनाचे मांडे खाताना दिसतात. अशा पार्श्वभूमीवर पोर्तुगाल सरकारचे हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@