भारतीय अरण्यातील वणवे- कारणे व मीमांसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018   
Total Views |

 

 

 
 
 
वणव्यांच्या संकटाने अनेक गावे बेचिराख झाली, मोलाच्या वनस्पती व प्राणिमात्रांच्या जाती नष्ट झाल्या. लोकांच्या भव्य सहलींवर मोठा परिणाम होऊन त्यांची संख्या कमी झाली. हवेत खूप मोठे प्रदूषण झाले.
 

भारतातील अरण्यांमध्ये आगी लागायची कारणे कोणती? एक कारण म्हणजे नैसर्गिकरित्या हवामानात उष्णता वाढणे व दुसरे जे महत्त्वाचे व बऱ्याच ठिकाणी घडत आहे ते म्हणजे मानवनिर्मित कारण. काही लोक आगी मुद्दाम लावत आहेत. त्यांचा हेतू कदाचित कळत वा नकळतपणे लाकूड सामान वा इतर गोष्टी मिळविण्यासाठी असू शकतो. काही गावकरी जमिनीवरचे गवत व पालापाचोळ्याला मुद्दाम आगी लावतात त्याचे कारण ते सांगतात, अशा छोट्या आगीच्या उष्णतेमुळे गवत जास्त प्रमाणात उगवते. अशा काही आगी मुद्दाम लावल्या जातात, हे वनखात्याचे अधिकारीही कबूल करतात. अरण्यातील वणवे जास्ती करून ईशान्येकडील प्रदेश, मध्य भारतातील प्रदेश आणि महाराष्ट्र व इतर प्रदेशांत लागतात. २०१६ मध्ये उत्तराखंडात मोठा वणवा लागला होता. दरवर्षी तेथे कमी-जास्तप्रमाणात वणवा लागतच असतो व गावे ओस पडतात.

 

गेल्या आठ वर्षांतील वणव्यांमुळे उत्तराखंडातील ८०० गावे भकास झाली आहेत. नेहमीच्या वणव्याच्या संकटांमुळे खाण्यापिण्याच्या पदार्थांचे दुर्भिक्ष्य झाले आहे, तर शेतीकाम करणे कठीणच होऊन बसले आहे. या भागात हिंस्त्र पशू फिरकत नाहीत. आता ससे, हरणे असे वनस्पतिजीवी प्राणी पण दिसत नाहीत२०१६ व २०१८ मधील वणव्यांच्या संख्येत फरक दिसत आहे. कारण, हे वणवे माणसांकडून काही हेतू मनात ठेवून, तर काही निर्हेतूक लावले जात आहेत. दोन वर्षांपूर्वी मे व जून २०१६ मध्ये वनखात्याने लक्ष ठेवून २५० हून अधिक माणसांना आगी लावताना पकडले आहे. त्यामुळेच कदाचित २०१७ मध्ये तेथील वणव्यांचे प्रमाण कमी झालेले दिसते.

 

केंद्रीय पर्यावरणखात्याचा व विश्व बँकेचा अलीकडील अहवाल या अरण्यांच्या वणव्यांची ठिकाणे ओळखण्याकरिता इस्रोच्या उपग्रहाच्या साहाय्याने राष्ट्रीय दूरस्थ संवेदनशील केंद्राकडून (NRSC) पुष्कळ माहिती कळू शकली४८ टक्के आगी या मध्य भारतातील उत्तराखंड व हिमाचल प्रदेश भागाच्या परिसरातील २० जिल्ह्यांमध्ये २००३ ते २०१६ या काळात मोठ्या प्रमाणात लागल्या. ४४ टक्के आगी या ईशान्येकडील प्रदेशातील २० जिल्ह्यांत छोट्या प्रमाणाच्या शेतातील होत्या. अहवालात वणव्यांच्या कारणांकरिता मीमांसा केली आहे. हवामानातील मोठ्या बदलांमुळे माती कोरडी होणे व उष्णता निर्माण होणे. विशिष्ट भौगोलिक रचना व उंचसखलपणा याचाही आगीची तीव्रता वाढण्यावर भर पडतो व बऱ्याचशा आगी या लोकांकडून लावल्या गेल्या आहेत, अशी कारणे पुढे आली आहेत. काही दमट हवा असलेले व पाने गळून पडण्याच्या मोसमामध्ये फेब्रुवारी ते मे या काळात छत्तीसगढ, महाराष्ट्र व तेलंगण या प्रदेशांत पण दरवर्षी वणवे लागतात.

 

वैष्णोदेवीच्या यात्रेकरुंच्या रस्त्यांच्या परिसरात लागलेल्या आगी

 

जम्मू-काश्मीरमधील ५ हजार २०० फूट उंचीवरील तिरुक्त टेकडीवरील वैष्णोदेवीचे तीर्थस्नान हे फार पवित्र मानतात. या यात्रेकरिता रोज ३५ हजार भक्तगण तिथे जात असतात. दरवर्षी ७५ लाखांहून जास्त यात्रेकरु वैष्णोदेवीच्या दर्शनाला येऊन पुण्य संपादन करतात. परंतु, वणव्यामुळे एक दिवस यात्रेचा रस्ता या वर्षीच्या मेमध्ये बंद ठेवायला लागला होता. दहा हजार भक्तगण वणव्यात कात्राच्या ठिकाणी अडकले होते. त्यांना सुखरूप जागेवर नेण्यात आले. २५ हजार जणांना सुखरूप अशा हिमकोटी मार्गाकडून जाण्यास सांगण्यात आले. गंगा व ताराकोट मार्ग बंद करण्यात आला. ‘एमआय-१७’च्या दोन हेलिकॉप्टर्सची सेवा कार्यान्वित करावी लागली. त्यातून त्यांना नेण्या-आणण्याची व त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागली.

 

महाराष्ट्रातील वणवे

 

या वर्षीच्या फेब्रुवारी व मार्चमधील फक्त ५ आठवड्यांत महाराष्ट्रातील अरण्यांच्या १५०० ठिकाणी वणवे लागले. ही संख्या देशातील कमी वेळात सर्वात जास्तीच्या आगी म्हणून नोंदवली गेली आहेभारतीय अरण्य सर्वेक्षण संस्थेतर्फे (FSI) जानेवारी २०१८ पासून मार्चपर्यंत देशात २२ हजार १२८ वणवे लागले, असे सांगण्यात आले. महाराष्ट्रात (२ हजार ४८८), मध्य प्रदेशात (१ हजार ५९३), ओडिशामध्ये (२ हजार १८), तेलंगणात (१ हजार ५८२) व छत्तीसगढमध्ये (१ हजार ७७७) वणवे लागल्याची नोंद झाली आहे. एफएसआयच्या माहितीप्रमाणे यातील बरेचसे वणवे हे मानवाकडूनच लावले गेले आहेत. अरण्यातील दाट झाडींना मुद्दाम आगी लावल्या जात आहेत. कारण, त्यातून त्यांना शेती करण्यास मोकळी जमीन मिळते. फार थोड्या अंशांनी उष्णतेच्या लाटेमुळे लागलेल्या आगी होत्या.

 

वॉचडॉग फाऊंडेशन संस्थेच्या गॉडफ्रे पिमेन्टा यांनी सरकारकडे तक्रारी केल्या आहेत की, हे सगळे वणवे सह्याद्रीतील पश्चिम घाटावरच्या अरण्यात रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून ते रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदेशांत सुमारे एक हजार एकर क्षेत्रांत मार्चमधील पहिल्या दोन आठवड्यांतच लावले गेले आहेत. त्यामुळे तेथील क्षेत्र काळे ठिक्कर पडले आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील वणव्यांची संख्या गेल्या दोन वर्षांतील संख्येपेक्षा जास्त झाली आहे. ही माहिती इस्रोच्या उपग्रहावरून मिळालेल्या नकाशावरून सरकारने ताडून, खात्री करून घेतली आहे. युनायटेड नेशनच्या बाह्य अवकाश विभागाकडून (UN's outer space affairs) कळले की, या आगी पश्चिम घाटातील बोडी, अहमलाई, कुरणगानी आणि कोट्टाआगुडी टेकड्यांच्या प्रदेशातील आहेत. अरण्यातील वणवे, वृक्षांच्या कत्तली, काही लोकांकडून घडलेली अरण्यातील कित्येक अनधिकृत व्यावसायिक कामे आणि इतर अतिक्रमणविषयक प्रकरणे यापुढे रिअल टाईम सॅटेलाईट इमेजिसच्या साहाय्याने नागपूरच्या वन भवन केंद्राच्या नऊ एलईडी मॉनिटरच्या रिलेईंग इमेजेस व व्हिडीओ कॉन्फरन्सच्या साहाय्यांनी सरकारकडून निर्णय घेऊन त्यावर कारवाई केली जाईल.

 

राष्ट्रीय उद्यानात वणव्यांचे सत्र सुरू

 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) येऊर, मुलुंड, नाहुर, भाईंदरपाडा व ठाणे परिसरात या वर्षीच्या मार्च महिन्यात भडकलेल्या भीषण वणव्याचे सत्र अनेक दिवस सुरूच राहिले. वणव्यामुळे वनसंपत्तीची मोठी हानी झाली आहे. हे वणवे जाणीवपूर्वक लावले गेले आहेत, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. गेल्या काळात असे अनेक प्रकार घडले आहेत व प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही पर्यावरणवाद्यांनी केला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राणिप्रेमी संघटना, रॉ आणि पॉझ संघटनेचे स्वयंसेवक, वनविभाग व अग्निशमन दल संस्था इत्यादींच्या एकूण १५० जवानांच्या मदतीने आग विझविण्यात आली. ‘योगी हिल’च्या आगीत काही छोटी मंदिरे दिसल्याची माहिती काहींनी दिली. या २२ हेक्टर क्षेत्रांतील आगी बिल्डर लॉबीकडून लावल्या जात असल्याची शक्यता काहींनी वर्तविली आहे. या क्षेत्रांतील अनेक महत्त्वाच्या वनस्पती व प्राणिमात्रांच्या जाती (flora and fauna) आगीत नष्ट झाल्या आहेत.
 

२०१६ मधील उत्तराखंडातील भीषण वणवा

 

वणव्यात व्याप्त व होरपळलेले क्षेत्र (२ हजार २६९ हेक्टर); अग्निशमन सेवा देणारे सहा हजार जवान वणव्याच्या ठिकाणी होतेनैनीताल तलावातील कित्येक लीटर पाणी हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने आग विझविण्याकरिता फेकण्यात आले. भीमतालमध्येही हेलिकॉप्टरमधून पाच हजार लीटरच्या बांबी बालदीमधून पाणी उचलले. जे की, गरव्हाल, अल्माखान, किल्बारी व नलेना अरण्यातील वणवे विझविण्याकरिता वापरले गेले. एकूण ‘एमआय १७ व्ही ५’ची तीन हेलिकॉप्टर्स वापरली गेली व त्यांनी ३० हजार लीटर पाणी विझविण्याकरिता वापरले.

 

एनडीआरएफच्या १३० जवानांची अनेक पथके प्रत्येकी आठ ते दहा किमी परिसरांतील हिरव्या झुडूपांवरील आगी विझविण्याकरिता क्रियाशील राहिलीएकूण ११५ ठिकाणी १ हजार ८२ आगी लागल्या. यात सातजण मृत्यूमुखी पडले व १५ जण जखमी झाले. या आगी भडकून त्या सुमारे ९० दिवस पेटत्या राहिल्या. सहा जिल्ह्यांत तीव्र आगी - डेहराडूनमधील (चक्राता व लख्वार), रूद्रप्रयागमधील (जाखोली), चामोलीमधील (कर्णप्रयाग, थराली आणि दशोली), पौरीमधील (खिरसू, पोख्री आणि यांपकेश्वर), अल्मोरामधील (बिन्सार आणि धौला देवी), नैनितालमधील (चंपावत) शिवाय केदारनाथ कस्तुरी हरणांचे आश्रयस्थान (sanctuary) सुमारे ६० हेक्टर क्षेत्र नष्ट झाले. हरिद्वारचे राखीव ७० हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आणि जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील १९८ हेक्टर क्षेत्र जळाले.

 

हे वणवे लागण्याची काय कारणे असू शकतात?

 

२०१४ ते २०१६ पर्यंत दोन वर्षांत कमी पाऊस पडला. त्यामुळे जमिनी कोरड्या पडल्या होत्या. हवामान बदलांतून उष्णता बाहेर पडली. लाकूडचोरट्यांनी वृक्षांना आगी लावल्या. उत्तराखंडांच्या अरण्यांत चीर व पाईन वृक्षांची झाडे १६ टक्केच्या व्याप्तीने उपलब्ध आहेत. सूचीपर्णीची, पाईन झाडाची पाने जमिनीवर पडल्यावर गालिचासारखे थर बनतात. ही पाईनची पडलेली सुकी पाने ज्वालाग्राही आहेत. वणव्यांच्या संकटाने अनेक गावे बेचिराख झाली, मोलाच्या वनस्पती व प्राणिमात्रांच्या जाती नष्ट झाल्या. लोकांच्या भव्य सहलींवर मोठा परिणाम होऊन त्यांची संख्या कमी झाली. हवेत खूप मोठे प्रदूषण झाले. भूजलाची पातळी खालावली. जमिनीची माती अस्ताव्यस्त झाली. राजकीय वर्तुळातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उत्तराखंडातील २०१६ मधील मोठा वणवा ही मागील सरकारच्या अकार्यक्षमतेची देणगी आहे. वनांच्या संरक्षणासाठी मिळालेल्या कोट्यवधी निधीचा फायर लाईन टाकण्याकरिता व इतर अग्निशमन कामाकरिता उपयोग केला असता, तर या वणव्याच्या संकटांपासून बचाव झाला असता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@