‘तरूण भारत’तर्फे अल्पना कला स्पर्धांतर्गत रांगोळी स्पर्धाउद्यापासून आयोजन धरणगाव, भडगाव, शेंदुर्णी, एरंडोल येथे रंगोत्सव

    14-Oct-2018
Total Views |

 

‘तरूण भारत’तर्फे अल्पना कला स्पर्धांतर्गत रांगोळी स्पर्धा
उद्यापासून आयोजन धरणगाव, भडगाव, शेंदुर्णी, एरंडोल येथे रंगोत्सव

 
जळगाव, 13 ऑक्टोबर 
बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी वाटचाल करतांना कला, साहित्य आणि संस्कृतीचीही जोपासणा करणार्‍या ‘जळगाव तरूण भारत’तर्फे नवरात्रोत्सवानिमित्त १४ ते १७ ऑक्टोबर दरम्यान अनुक्रमे धरणगांव, भडगाव, शेंदुर्णी आणि एरंडोल येथे ‘अल्पना कला स्पर्धा - २०१८’ अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
केवळ सौंदर्य चिन्हच नव्हे तर भारतीय संस्कृतीचीही ओळख असलेली रांगोळी ही कला जगभर विविध नावांनी ओळखली जाते. भूमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रांगोळी घातली जाते. या क्षेत्रात महिला विशेष वाक्बगार असतात, असे समजले जाते. मात्र हल्ली अनेक पुरूषही या क्षेत्रात तरबेज असल्याचे दिसून आले आहे.
 
या अंगभूत कला गुणाला वाव देवून त्याची अभिव्यक्ती करण्यासाठी जळगाव तरूण भारततर्फे अल्पना कला स्पर्धा - २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. यातील प्रथम विजेत्याला रू.१००१/, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला रू.७०१/, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला रू.५०१/-, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र तर २ उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सहभागी होणार्‍या सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
सर्वांसाठी खुली असलेली ही स्पर्धा ४ ठिकाणी होणार आहे.
 
रांगोळी क्षेत्रातील मान्यवरांकडून या स्पर्धेचे परीक्षण होणार असून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र दिली जातील. आपल्या कलागुणांची अभिव्यक्ती असलेल्या या रांगोळी स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी
केले आहे.
 
 
१४ ऑक्टोबर  ' धरणगाव '
धरणगाव येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ६.३० दरम्यान मोठा माळी वाडा, गुरव गल्ली, झांजी बुवा चौक येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी श्री राम सेना संघटना, महात्मा फुले युवा क्रांती मंच तसेच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदाय यांचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहितीसाठी ७५८८६४६२९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
१५ ऑक्टोबर  ' भडगाव '
भडगाव येथे १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ६.३० दरम्यान संत सेना महाराज विठ्ठल रूख्मिणी मंदिर शिवाजी नगर, तळणीजवळ येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. येथे या स्पर्धेसाठी डॉ.संजीव पाटील युवा प्रतिष्ठान, पाचोरा - भडगाव यांचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहिती ९९७००७४६१४ या क्रमांकावर संपर्क साधल्यास मिळू शकेल.
 
१६ ऑक्टोबर  ' शेंदुर्णी '
शेंदुर्णी, ता.जामनेर येथे १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ दरम्यान पारस जैन मंगल कार्यालय येथे ही रांगोळी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी येथील राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहिती ९५१८७९८२६० या क्रमांकावर संपर्क साधल्यास मिळू शकेल.
 
१७ ऑक्टोबर ' एरंडोल '
एरंडोल येथे १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ दरम्यान येथील नगरपरिषद हॉलमध्ये ही रांगोळी स्पर्धा पार पडणार आहे. या
स्पर्धेसाठी करणदादा पाटील मित्र परिवाराचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहितीसाठी ८९९९३०५६५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.