तळोद्यात साफसफाईसाठी ६ वाहनांचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |

तळोद्यात साफसफाईसाठी ६ वाहनांचे लोकार्पण
 
तळोदा, १३ ऑक्टोबर
मागील १५ वर्षात केलेली घाण एक वर्षात कशी स्वच्छ होणार असे सूचक व्यक्तव्य करत आमदार उदेसिंग पाडवी मागील सत्ताधारी ना टोला लगावला शहरात स्वच्छता अधिक उत्तमरीत्या राबविण्यासाठी ओला व सुक्का कचरा संकलन साठी नवीन ६ वाहनांची खरेदी केली आहे यांचे लोकार्पण तसेच कचराकुंडी शहरातील नागरिकांसाठी वाटप कार्यक्रम आज आमदार उदेसिंग पाडवी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगरअध्यक्ष भाग्यश्री चोधरी तर स्वछता व पाणी पुरवठा समिती सभापती सूनयना उदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
 
तळोदा नगरपालिका प्रांगणात घंटागाडी लोकार्पण सोहळा, व कचराकुंडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला.. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपनगराध्य भाग्यश्री चौधरी, आरोग्य सभापती सुनयना उदासी, बांधकाम सभापती भास्कर मराठे, पाणी पुरवठा सभापती सविता पाडवी, बालकल्याण सभापती अंबिका शेंडे, भाजपा तालुका अध्यक्ष श्यामसिंग राजपुत, नगरसेविका शोभा भोई, बेबीबाई पाडवी, अनिता परदेशी, प्रतीक्षा ठाकूर, सविता पाडवी, नितीन उदेसिंग पाडवी, नगरसेवक रामानंद ठाकरे, अमानुदिन शेख, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र माळी, योगेश पाडवी, योगेश चौधरी, जितेंद्र दुबे, हिरालाल पाडवी, हेमलाल मगरे, योगेश मराठे, संदीप परदेशी, जालंधर भोई, सुनील सोनेरी, किरण सूर्यवंशी, जगदीश परदेशी, सुभाष शिंदे, भय्या चौधरी, आदी उपस्थित होते.. घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका संपल्याने शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न बिकट बनला होता. संपूर्ण शहराचा कचरा संकलनाची जबाबदारी केवळ २ वाहनावावर होती. यावर मार्ग काढत स्वच्छ भारत मिशन घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत तळोदा नगर पालिका कृती आराखडयातून टाटा २ टन क्षमता असलेले १७ लाख ३० हजार किमतीचे सहा वाहने खरेदी केली आहेत.. या वाहनांचे लोकार्पण व शहरातील प्रत्येक घराकरिता ओला व सुखा कचर्‍याकरिता प्रत्येकी दोन डस्टबिनचे वाटप आमदार उदेसिंग पाडवीच्या हस्ते करण्यात आले.. आमदार पाडवी पुढे बोलताना म्हणाले की, शहराने विकासाकडे वाटचाल सुरू केली आहे. भाजप सरकारने स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. त्यांनी लगावला.
 
पालिकेने कर वसुलीवर भर दिला पाहिजे. याकरिता जनतेने सहकार्य करावे. दिवाळी अगोदर तळोदा शहादा विधानसभा मतदार संघासाठी सुसज्ज रुग्णवाहिका व शव वाहिनी देणार आहे. म्हाडाची योजना तळोदा शहरासाठी राबविणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. नगराध्यक्ष अजय परदेशी बोलताना म्हणाले की, १५ वर्षात विरोधी पक्षाकडून काहीच झाले नाही. खान्देशात सर्वात जुनी पालिका आहे. कचरा संकलन करणारे २ ट्रेकटर निष्काशीत करण्यात आले होते. पर्यायी म्हणून ६ घंटागाड्या कचरा संकलनासाठी दिल्या आहेत. १३ कोटीचा डी. पी.आर मंजूर झाला आहे. येत्या जून पावेतो पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. सूत्रसंचालन अनुप उदासी यांनी केले.
 
२६ जानेवारीचे ध्वजारोहण नवीन जागेतच होणार
तळोदा पालिकेतील प्रलंबीत असणार्‍या जलशुद्धीकरण प्रकल्प व पालिकेचे नवीन वास्तू चे बांधकाम संथपणे सुरू असून ते लवकर पूर्ण होऊन स्थलांतरित होणे अपेक्षित असल्याचे वस्तू निष्ठ वृत्त दैनिक सकाळ ने प्रकाशित करून पालिका प्रशासनास जागरूक केलं होतं याची दखल घेत आज सकाळी घंटा गाडी लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलतांना प्रास्ताविकात दैनिक सकाळ चा जाहीर पणे उल्लेख करत हातोडा पाणी पुरवठा योजनेसाठी अंतिम टप्प्यातील कामा साठी निधी मंजूर झाला असून या कामाला निश्चितपणे गती देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले तर पुढील जानेवारी अखेर पालिका नवीन जागेत कोणताही परिस्थितीत स्थलांतर होणार असल्याचे सांगत येणारा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण नवीन पालिकेतच होणार असल्याचे नगराध्यक्ष परदेशी यांनी सांगितले.
- नगराध्यक्ष अजय परदेशी
 
@@AUTHORINFO_V1@@