दहा दिवसात भारनियमनाचा प्रश्‍न सुटणार ; गिरीश महाजन

    12-Oct-2018
Total Views |



डोंबिवली : ऑक्टोबर हिट मुळे राज्यात सर्वत्र कोळशाच्या मागणीत वाढ झाली आहे, त्यामुळे राज्यात सध्या कोळशाचा तुटवडा जाणवत आहे, म्हणूनच राज्यात भारनियमनाची समस्या जाणवत आहे. पण येत्या १० दिवसात ही समस्या दूर केली जाईल, असे प्रतिपादन जलंसपदा मंत्री गिरीश महाजन यांनी डोंबिवलीत केली. तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील सहा खासदार आणि 50 आमदारांची सीट धोक्यातही बातमी म्हणजे सोशल मीडियावरील निव्वळ टाईमपास सुरू असून त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे ही ते म्हणाले. डोंबिवली येथे एका प्रकल्पाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

 

महाराष्ट्राचा कोळसा ज्या ठिकाणी निवडणूका आहेत, त्या ठिकाणी वळविला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्रात भारनियमनाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता, हा आरोपही महाजन यांनी फेटाळून लावला. सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्यात संपूर्ण देशात विजेची मागणी वाढते. त्यामुळे कोळशाचा तुटवडा जाणवू लागला आहे. केंद्राकडून कोळसा येण्यास काहीसा विलंब होत असला तरी ही येत्या १० ते १२ दिवसात ही समस्या दूर होईल, असे आश्वासनही यावेळी महाजन यांनी दिले.

 

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यात केवळ २६ टक्के पाणीसाठे शिल्लक आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री राज्यभरात बैठका घेत आहेत. यासंदर्भात औरंगाबाद येथे नुकतीच बैठक पार पडली. सरकार या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/