रा. स्व. संघ विजयादशमी उत्सवास कैलास सत्यार्थी उपस्थित राहणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2018
Total Views |
 
 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग, नागपूर येथे होणार्‍या विजयादशमी उत्सवास प्रमुख अतिथी म्हणून यंदा बालअधिकार कार्यकर्ता व नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित राहणार आहेत. रा. स्व. संघातर्फे आपले मुख्य कार्यालय रेशीमबाग येथे सरसंघचालकांच्या उपस्थितीत प्रतिवर्षी विजयादशमी उत्सव घेण्यात येतो व विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांना यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येते. गुरुवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४० वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे यावेळी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. नागपूर महानगर संघचालक राजेश लोया व मानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी जारी केलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@