सिंचन घोटाळा नवा खुलासा : १३ आरोपींविरोधात ४ हजार ४५७ पानांचे आरोपपत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |

 
नागपूर : राज्यभर गाजलेल्या विदर्भातील सिंचन घोटाळ्यासंबंधी आज आणखी एक घटना घडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आज विशेष एसीबी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळच्या ५ तत्कालीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच कालव्याच्या बांधकामाची निविदा मिळालेल्या मेसर्स आर. जे. शाह अॅण्ड कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ७ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
 
गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मोखाबर्डी उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्याच्या निविदातील गैरव्यवहारप्रकरणी ३० एप्रिल २०१६ रोजी नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. राज्यातील सिंचन खात्यात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात खुल्या चौकशीचे आदेश गृह विभागाने दिले होते. यासंदर्भात चौकशी पूर्ण करून एसीबीच्या चौकशीनंतर हजार ४५७ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
 
हे आरोपपत्र पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात आहे. हा कालवा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या गोसीखुर्द सिंचन प्रकल्पावरील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेअंतर्गत येतो.
 
सिंचन घोटाळा प्रकरणात मे. आर. डे. शाह आणि कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
या आरोपपत्रानूसार दोषी कंत्राटदारांना नियमबाह्य सवलत देऊन अधिकाऱ्यांकडून पात्र ठरविण्यात आले होते. याप्रकरणी मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि संबधित विभागीय लेखाधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हे कंत्राटदार आणि अधिकारी दोषी असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@