शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : प्रेशर कूकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018   
Total Views |

 
प्रेशर कूकर.. आपल्या सगळ्यांच्याच आयु्ष्यातील एक अविभाज्य घटक. त्याशिवाय आपला दिवस जावूच शकत नाही.. मऊ भात आणि गरम वरण देणारा हा प्रेशर कूकर. मात्र याच्या शिट्या एका मर्यादेनंतर वाजू लागल्या की आपल्याला त्रास होतो नाही त्याचा. हे सगळं रामायण सांगण्याचं कारण म्हणजे या लघुपटाची कथा. खरं तर प्रेशर कूकरच्या नावाखाली दिग्दर्शकाने नवरा बायको मधील कुठतरी थोडंसं हरवलेलं प्रेम परत कसं मिळवायचं हे या लघुपटातून दाखवलं आहे.
 
 
 
 
असं म्हणतात साधारण चाळीशीनंतर नवरा आणि बायको यांच्यात एक एशी फेज येते ज्यामध्ये त्यांच्यातील "रोमँस" थोडा कमी झालेला असतो. मात्र त्यावेळी नात्यातून बाहेर पडणं, वेगळे पर्याय शोधणं असे कितीतरी उपाय असतात मात्र आपल्याच पार्टनर मधलं हरवलेलं प्रेम शोधण्यात या फेजची खरी मजा असते. तीच फेज या लघुपटात दाखवण्यात आली आहे.
 
प्रसिद्ध तारका पल्लवी जोशी यात मुख्य भूमिकेत आहे. एका मध्यमवर्गीय बायकोच्या भूमिकेत. तिचा लग्नात मिळालेला प्रेशर कूकर खराब होतो, त्याची शिट्टी सतत वाजत असते. तिच्या नवऱ्याचे तिच्याकडे पूर्वी सारखे लक्ष नसते असं एकूण तिला जाणवत असतं. खरं तर ती कूकरची शिट्टी म्हणजे तिच्या आयुष्यातील एक फेज असते. पण आपला प्रेशर कूकर खराब झाला म्हणजे तो लगेच बदलायचा नसतो त्यात दुरुस्ती करुन तो वापरता देखील येतोच ना.. हाच संदेश नात्यांच्या बाबतीत या लघुपटात देण्यात आला आहे.
या लघुपटात त्या गृहिणीच्या मनातली चलबिचल खूप साध्या आणि नैसर्गिक पद्धतीने दाखविण्यात आले आहे. या लघुपटाला जिओ फिल्म फेस्टिवलमध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच या लघुपटाला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एकदा तरी नक्कीच बघावा असा हा लघुपट आहे.
 
- निहारिका पोळ  
@@AUTHORINFO_V1@@