सुधीर मुनगंटीवार हा दिलेला शब्‍द पूर्ण करणारा लोकनेता – चंदनसिंह चंदेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
मानोरा येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे भूमीपूजन संपन्‍न
 
चंद्रपूर: विकासासंबंधी आजवर जो शब्‍द सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला तो प्राधान्‍याने पूर्ण केला आहे म्‍हणूनच शब्‍दाला जागणारा नेता अशी त्‍यांची राज्‍यभर ख्‍याती आहे. बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍थापन करण्‍याचा निर्णय त्‍यांच्‍या पुढाकाराने घेण्‍यात आला.
 
चंद्रपूर जिल्‍हयात आरोग्‍य सेवा बळकट करण्‍याच्‍या दृष्‍टीने नेहमीच त्‍यांनी पुढाकार घेतला असुन रूग्‍णसेवा हीच ईश्‍वराची सेवा आहे असे समजून कार्य करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचा आम्‍हाला अभिमान असल्‍याचे प्रतिपादन महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.
 
 
दिनांक ५ जानेवारी रोजी बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा या गावात प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या भूमीपूजन कार्यक्रमात चंदनसिंह चंदेल बोलत होते. यावेळी बल्‍लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंद पोडे कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी होते. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@