भिडे गुरुजींचा भीमा-कोरेगाव प्रकरणाशी काहीही संबंध नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |

 
सांगली : संभाजीराव भिडे गुरुजींचा भीमा-कोरेगाव प्रकरणाशी काहीही संबंध नाही, अशी अधिकृत भूमिका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे मांडण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजीराव भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मात्र त्यात कुठलेही तथ्य नाही, असे शिवप्रतिष्ठान तर्फे स्पष्ट केले गेले आहे.
 
संभाजीराव भिडे गुरुजींनी सदर प्रकरण घडण्यापूर्वी त्याविषयाशी निगडीत कोठेही सभा घेतली नाही, कोणतेही आवाहन केले नाही, तसेच कोणतेही वक्तव्य केलेले नाही. असे असताना त्यांच्यावर खोडसाळपणे आरोप केला गेला असल्याचे शिवप्रतिष्ठानतर्फे काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
 
भीमा-कोरेगावचा दुर्दैवी प्रकार होत असताना संभाजीराव भिडे गुरुजी ३२ मण सिंहासन कार्यक्रमाच्या सभा घेत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या मातोश्रीच्या निधनाबाबत सांत्वन करत होते, त्यानंतर भोर येथे हजारो धरकार्यांची सभा झाली. या सर्वांचे भक्कम पुरावे असताना फिर्यादींनी त्यांना सदर ठिकाणी पहिल्याचा खोटा कांगावा केला.
 
संभाजीराव भिडे गुरुजी शिवप्रतिष्ठानच्या मध्यानातून लाखो तरुणांच्या मानत देश, धर्म आणि संस्कृती विषयक प्रेम निर्माण करत आहेत. गुरुजींच्या माध्यमातून गडकोट मोहिमा, श्री दुर्गामाता दौड, यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. अशा पार्श्वभूमीवर कुणीतरी जाणीवपूर्वक त्यांचे नाव गोवून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान तर्फे केला गेला आहे.
 
त्याचबरोबर या घडलेल्या प्रकरणाची राज्य सरकारने खोलात जाऊन चौकशी करावी, यामागे नेमका कुणाचा कट आहे, हे समोर आणावे, असे आवाहन केले गेले आहे.
 

 
 
@@AUTHORINFO_V1@@