भंडारामध्ये आज “ सक्षम ” नाविण्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
भंडारा: जिल्हा प्रशासन भंडारा व मानव विकास कार्यक्रम, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्हयात "सक्षम" हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात येत आहे. प्रचलीत शिक्षणासोबत मुलांमध्ये आधुनिक कौशल्य व मुलभूत मुल्यांचे संस्कार बालवयापासून रुजविणे हा सक्षम उपक्रमाचा मुळ उद्देश आहे. "सक्षम" उपक्रमाचा शुभारंभ ४ जानेवारी २०१८ रोजी दुपारी २ वाजता हेमंत सेलिब्रेशन, बेला भंडारा येथे होत आहे. 
 
स्वच्छता व निटनेटकेपणा, वक्तशिरपणा, संवेदनशिलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, सौजन्यशिलता, सर्वधर्म सहिष्णुता, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रिय एकात्मता व राष्ट्रभक्ती ही १० मुल्य या उपक्रमात आहेत. वाटाघाटी, उत्कृष्टता, संघर्ष व्यवस्थापन, निर्णयक्षमता, ताणतणावाचे व्यवस्थापन, डिजीटल नागरिकत्व, उद्योजकता, जिज्ञासा, दृश्यक्षमता, नेतृत्व पुढाकार, कल्पना निर्मिती, समस्या निराकरण, चिकित्सक विचार प्रणाली, प्रणाली विचार, माहिती साक्षरता, पार्श्विक विचार, नव निर्मिती, समानुभूती, लवचिकता, स्वचा विकास, अनुकूलता अशा २१ कौशल्याचा अंर्तभाव सक्षम उपक्रमात केल्या गेला आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@