सामाजिक सौहार्द व शांतता राखण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
चंद्रपूर: भिमा कोरेगाव येथील दुर्घटनेनंतर जिल्हयात विविध संघटनांनी बंद पुकारला आहे. आपल्या भावना संविधानिक माध्यमातून शासनापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन तत्पर असून जनतेने शांततेने आपला निषेध नोंदवावा. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नियति ठाकर यांनी केले आहे.
 
चंद्रपूर जिल्हयाची ख्याती सामाजिक सौहार्द व शांतता पाळणारा जिल्हा अशी आहे. त्यामुळे सर्व जिल्हावासियांनी शांतता पाळावी व अफवांवर विश्वास ठेऊ नये. व्हॉटसअप् ग्रुपवर सामाजिक शांतता भंग करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यावर सायबर सेलचे बारकाईने लक्ष असून अशा समाजकंटकावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
शहरात काही संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. पुढील काळातही कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. निषेध हा शांततापूर्ण मार्गाने नोंदवावा , कायदा हाती घेण्याचा प्रयत्न करू नये , असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
शहरात बुधवारी अनेक शाळांनी शाळा बंद ठेवल्या होत्या. बंदला पाठींबा दिला आहे. मात्र पुढील काळात सार्वजनिक उपक्रम, वाहन व्यवस्था आणि महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांना कोणत्याही अघटीत घटनांमधून त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 
 
संपूर्ण जिल्हयात मोठया प्रमाणात पोलीस यंत्रणा सर्वत्र कार्यरत आहे. कोणत्याही घटनाक्रमाची माहिती दयायची असल्यास संबंधित भागातील पोलीस ठाण्याला जनतेने माहिती दयावी, अफवा पसरु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 
@@AUTHORINFO_V1@@