शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : अंकुर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018   
Total Views |

 
खरं तर अंकुर या लघुपटाचे नाव नाहिये. मात्र हा लघुपट बघून मला हेच नाव सुचलं. या लघुपटाचे नाव काय? प्रश्नच आहे... मात्र काही सुंदर अनुभूतींना नावाची आवश्यकता नसते, आणि त्या अनुभूतींपैकी एक म्हणजे हा लघुपट. हा लघुपट बघून मला एक हिंदी कविता आठवली..
 
 
"अंकुर मिट्टी में सोया था
सपने में खोया था
नन्हा बीज हवा ने लाकर
एक जगह बोया था

तभी बीज ने ली अँगड़ाई
देह जरा-सी पाई
आँख खोलकर बाहर आया
दुनिया पड़ी दिखाई."
 
 
त्याचे कारण म्हणजे, कधी कधी कसं होतं ना आपल्याला जो आनंद हवा असतो, तो अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. काही गोष्टी बोलून सांगता येत नसतात त्या फक्त अनुभवायच्या असतात. आईच्या प्रेमाप्रमाणे निसर्गावर केलेले प्रमेही तितकेच गोड असते. आणि निसर्गाची सुंदरता वाढण्यासाठी त्यावर प्रेम करणे आवश्यक आहे. मी हे सगळे का म्हणतेय?... 
 
 
 
 
कारण ही कथा पण अशीच आहे. ही कथा आहे एका छोट्या मुलाची आणि त्याच्या आई वडीलांची. गम्मत म्हणजे या लघुपटात एकही संवाद नाहीये. आई वडील कामात व्यग्र असतात. हा चिमुकला व्हिडियोगेम खएळायला जातो, टॅब खेळतो, मोबाइल खेळतो, टीव्ही बघतो मात्र प्रत्येका आवाजानी त्याच्या आईला त्रास होतो आणि ती सतत त्याच्या हातातून सर्व काढून घेते. गाल फुगवलेला हा चिमुकला खाली बागेत जातो, आणि तिथे माळ्याला काम करताना बघतो. आणि ठरवतो 'आपल्याशी कुणी बोलत नाही तर काय झालं माझं झाड माझ्याशी गप्पा मारेल."
 
आई वडीलांवर तसाच चिडलेला असताना तो वर येतो आणि एक छोटं रोपटं लावण्याचा प्रयत्न करतो. आणि बघतो तर काय त्याची आई पण एक रोपटं लावायला घेते. (एव्हाना आईला आपली चूक कळलेली असते.) त्यापुढे काय होतं? आईची आणि पिल्लूची गट्टी कशी जमते. आईच्या रोपाला आधी पालवी फुटते की पिल्लूच्या? जाणून घेण्यासाठी एकदा नक्कीच बघा हा लघुपट.
 
मात्र त्या रोपट्याच्या आनंदाने वाढण्याकडे ज्या प्रेमासह आणि आनंदासह तो चिमुकला बघतो, त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. या लघुपटाविषयी माहिती जाणून घेण्याच्या खूप प्रयत्नांनंतरही याच्या दिग्दर्शक, प्रायोजक आणि कलाकारांविषयी माहिती मुळू शकली नाही, मात्र एका छान अनुभवासाठी हा लघुपट एकदा नक्कीच बघा. या लघुपटाला यूट्यूबवर ३३ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
 
- निहारिका पोळ  
@@AUTHORINFO_V1@@