धर्मा पाटील यांचे पार्थिव त्यांच्या गावी दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |
 
 
धुळे : धर्मा पाटील यांचे पार्थिव त्यांच्या गावी राहत्या घरी आणण्यात आले आहे. यावेळी दु:खाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या लिखीत आश्वासनानंतर अखेर त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. यावेळी संपूर्ण गावात शोककळा पसरली.
 
धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे राजकारण न करता माणूसकीच्या नात्याने सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. सरकारने तीस दिवसात चौकशी करून मोबदला देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही नरेंद्र पाटील यांनी दिली.
 
गावात थोड्याच वेळात धर्मा पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गावातल्या स्मशानभूमीत पाटील यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@