चंद्रपूरातील अत्‍याधुनिक बसस्‍थानक १८ महिन्‍यात जनतेच्‍या सेवेत रूजु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
१६ कोटी रू. किंमतीचे बसस्‍थानकाच्‍या कामाचा भुमीपूजन सोहळा संपन्‍न
 


चंद्रपूर: सन २०१५ चा अर्थसंकल्‍प सादर करताना एसटी बसस्‍थानकांचा चेहरामोहरा बदलण्‍याची घोषणा अर्थमंत्री म्‍हणून मी केली होती. या घोषणेला अनुसरून चंद्रपूरातील मुख्‍य बसस्‍थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरणासाठी १६ कोटी रू. निधी मंजूर केला. आज या कामाचे भूमीपूजन पाच सेवानिवृत्‍त कर्मचा-यांच्‍या शुभहस्‍ते करताना मला मनापासुन आनंद होत आहे. बल्‍लारपूर आणि मुल या ठिकाणच्‍या बसस्‍थानकांचे आधुनिकीकरण व नुतनीकरणाचे काम सुध्‍दा सुरू करण्‍यात आले आहे. यापुढील काळात पोंभुर्णा, नागभीड, चिमूर, गोंडपिपरी, कोरपना, घुग्‍गुस सर्वच ठिकाणची बसस्‍थानके देखणी होतील असे प्रतिपादन राज्‍याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
बसेसच्‍या खरेदीसाठी विशेष निधी आपण उपलब्‍ध केला आहे. नव्‍या बसेस मधील १० टक्‍के नव्‍या बसेस चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्‍हयांमध्‍ये देण्‍याबाबत आपण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सांगीतले आहे. चंद्रपूरातील बसस्‍थानक आधुनिक स्‍वरूपात १८ महिन्‍यांच्‍या कालावधीत नागरिकांच्‍या सेवेत रूजु होईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. 
 
@@AUTHORINFO_V1@@