कोल्हापूर अपघातग्रस्तांना सरकारकडून ५ लाखाची मदत - चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2018
Total Views |


कोल्हापूर : पंचगंगेच्या पुलावरून कोसळून झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रूपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. रात्री घडलेल्या या अपघातानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहाणी केली.

 
काल रात्री गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या मिनी बसला ११.३० च्या सुमारास अपघात झाला होता. यात १३ प्रवाशांचा मृत्यु झाला असून ३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पुण्यातील केदारी, वरखडे आणि नांगरे हे कुटुंबीय फिरण्यासाठी आणि देवदर्शनासाठी गेले असताना हा अपघात झाला आहे. एकूण १७ जण या मिनी बसमध्ये होते. काल कोल्हापूरकडे येत असताना बस चालकाचा गाडीवील ताबा सुटल्याने पंचगंगा नदीच्या पूलावरून बस खाली कोसळली होती.


या दुर्घटनेत ७ महिला, ५ पुरूष आणि एक १० महिन्यांच्या बाळाचा मृत्यु झाला आहे. तर, प्राजक्ता नांगरे (वय १८), मनिषा वरखडे (वय ३८) आणि मंदा केदारी (वय ५८) या जखमी झाल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@