आधी 'मेवाणी' आता 'अब्दुल्ला'

    26-Jan-2018
Total Views |

विरोधकांचा नवी खेळी ?
संविधान बचाव रॅलीसाठी ओमर अब्दुल्लांना आमंत्रण

 
मुंबई : केंद्र सरकारला घेरण्यासाठी दररोज वेगवेगळे प्रयत्न करत असलेल्या राज्यातील विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारला घेरण्यासाठी आता नवीन डाव सुरु केला आहे. भाजप सरकारच्या राज्यात भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला असून संविधानाच्या रक्षणासाठी आज मुंबईमध्ये सर्व विरोधकांकडून 'संविधान बचाव रॅली'चे आयोजन करण्यात आले असून या रॅलीसाठी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काश्मीरच्या स्वातंत्र्याला पाठींबा देणारे ओमर अब्दुल्ला यांना या रॅलीसाठी आज बोलावण्यात आले आहे.
 
केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी आज संविधान बचाव रॅली आयोजित केली आहे. यामध्ये सर्व राज्यातील सर्व विरोधी नेते आज सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
 
 
हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकूरची देखील उपस्थिती 
 
दरम्यान या यात्रेत गुजरात येथून पाटीदार नेता हार्दिक पटेल, ठाकूर नेता आणि नवनिर्वाचित आमदार अल्पेश ठाकूर देखील उपस्थित होते. संविधान वाचेल तरच तिरंगा उंचावेल, असे मत हार्दिकने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. गुजरात निवडणूक झाल्यानंतर प्रथमच हे दोन्ही नेते महाराष्ट्रात बघायला मिळाले.
 
 
आज मुंबईत निघालेली 'संविधान बचाव रॅली' ही कोणत्याही राजकीय पक्षाने वा नेत्याने आयोजित केलेली नव्हती, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. स्वाभिमानी पक्षाचे खा. राजू शेट्टी आणि आ. जितेंद्र आव्हाड या दोघांनी पुढाकार घेऊन सर्व राजकीय पक्षांना, विशेषतः धर्मनिरपेक्षतेची विचारधारा अवलंबणाऱ्यांना एकत्र आणले, असे त्यांनी मत मांडले.