रणक्षेत्रे त्रिपुराक्षेत्रे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2018   
Total Views |
 
 
 
डाव्यांची स्थिती ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झालेली आहे. डाव्यांनी राज्यात केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला ४८ जागांवर घसघशीत विजय मिळत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आल्यामुळे अस्वस्थ झालेल्या माकपने जबरदस्त अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. राज्यातल्या कॉंग्रेस नेत्यांना गुंडाळण्यासाठी यापूर्वी डाव्यांनी केंद्रातल्या कॉंग्रेस नेत्यांशी सेटिंग केले, यावेळीही आमचे केंद्रातल्या भाजप नेत्यांशी सेटिंग झाले असल्याचा धादांत असत्य प्रचार डाव्यांनी सुरू केला आहे. निवडणूक जवळ येईल, तशी अशा अफवांना ऊत येणार आहे.
 
 
त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारीला निवडणुका घोषित झाल्या. त्यापाठोपाठ भाजप आणि ‘इंडीजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा’ची (आयपीएफटी) युती जाहीर झाली. या संभाव्य युतीचा अंदाज आल्यामुळे माकपने आधीपासूनच बोटं मोडायला सुरुवात केली होती. जनजातीय क्षेत्रामध्ये बर्‍यापैकी जनाधार असलेल्या ‘आयपीएफटी’ला सोबत घेऊन भाजपने माकपची पुरती कोंडी केली आहे.
 
 
राज्यातल्या ६० जागांपैकी जनजातीयांसाठी राखीव असलेल्या २० जागांवर आपलाच एकाधिकार असल्याची शेखी डावे नेते आजवर मिरवत आले. त्यात बर्‍यापैकी तथ्यही होते, पण भाजपने ‘आयपीएफटी’ला जवळ केल्यामुळे या समीकरणाला धक्का बसला आहे. जनजातीय बांधवांसाठी स्वतंत्र राज्याची ‘आयपीएफटी’ची मागणी आहे. परंतु, ‘ही मागणी बाजूला ठेवाल तरच युती,’ अशी भूमिका भाजपने सुरुवातीपासून घेतली होती. ही मागणी गळी उतरविण्यात भाजपला यश आल्यामुळे युती भाजपच्या शर्तीवर झाली, असे म्हणायला वाव आहे. जागावाटप झालेले नसले तरी हा काही मोठा झमेला नाही. ‘आयपीएफटी’ने १५ जागा मागितल्या आहेत. भाजपची सात जागा सोडण्याची तयारी आहे. परंतु, डाव्यांचा खात्मा हा दोन्ही पक्षांचा समान अजेंडा असल्यामुळे दोन्ही बाजूंनी कोणी ताणून धरणार नाही, ही बाब निश्चित.
 
आठवड्याभरापूर्वी ’त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा माणिक सरकार’ या माझ्या पुस्तकाच्या बांगला आवृत्तीच्या निमित्ताने त्रिपुरात जाणे झाले. आठवड्याभराच्या मुक्कामात मी राज्यातल्या राजकारणाच्या अंतस्थ प्रवाहाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमधले वेटर, दुकानात कामकरणारा कामगार, चहाच्या मळ्यात कामकरणारा मजूर, व्यापारी, सरकारी कर्मचारी अशा विविध आर्थिक- सामाजिक स्तरातल्या लोकांशी चर्चा केली. त्रिपुरात डाव्यांची प्रचंड दहशत असल्यामुळे सरकारच्या विरोधात बोलण्यास सहसा कोणी धजावत नाही. आपल्यावर ‘वॉच’ ठेवला जातोय ही भीती असते. परंतु, विश्वासात घेतल्यावर अनेकांनी राज्यात बदल व्हायला पाहिजे, अशी भूमिका मांडली. याच चर्चेच्या दरम्यान देबबर्मा जनजातीच्या एका तरुणाने, ‘‘मी ‘आयपीएफटी’लाच मत देईन,’’ असे ठणकावून सांगितले होते. ‘आयपीएफटी’ आणि भाजप सोबत येतील, असा त्याचा होरा होता. ‘‘दोघांची युती झाली नाही, तर मात्र भाजपला मत देणार,’’ असे मत त्याने व्यक्त केले होते. त्या तरुणाचे मत प्रातिनिधीक होते, असे मानायला वाव आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन जनमानसाचा मान राखला, असे म्हणता येईल.
 
 
राज्यात देबबर्मा, जमातिया, त्रिपुरा, रीयांग आदी १७ जनजाती आहेत. एकेकाळी त्रिपुरात देबबर्मा जनजातीच्या राजघराण्याचे शासन होते. त्यात १६ जनजाती होत्या. बांगलादेश निर्मितीच्या काळात तिथून पलायन करून आलेल्या चकमांची यात भर पडली. एकूण लोकसंख्येत ३४ टक्के जनजातीय आहेत. राज्यातल्या २० जागा त्यांच्यासाठी राखीव आहेत. त्यामुळे या जागांवर एकाधिकार सांगणार्‍या डाव्यांना या युतीमुळे पोटशूळ झाला नसता तरच नवल!
 
 
दोन्ही पक्षांमध्ये युती होणार, असे गृहीत धरून माकप नेत्या वृंदा करात यांनी भाजपवर तोफ डागली होती. ‘‘ही युती देश तोडणारी आहे,’’ असा प्रचार डाव्यांनी सुरू केला आहे. जेएनयुमधल्या ‘तुकडे-तुकडे गँग’ला कायमपाठिंबा देणार्‍या डाव्यांना अचानक देशहिताचा जबरदस्त उमाळा आला आहे. स्वत: मुख्यमंत्री माणिक सरकार देवधर्माला लागले आहेत. त्रिपुरात अनुकूल ठाकूर या दिवंगत संताचा मोठा संप्रदाय आहे. आगरतळा येथे त्यांचे चिरंजीव आणि उत्तराधिकारी बाबईदा यांचा कार्यक्रमझाला. त्यात हजारो अनुयायांनी हजेरी लावली होती. माणिक सरकार यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांचे आशीर्वाद घेतले. हे यापूर्वी कधी घडले नव्हते. डाव्यांच्या जाहीर कार्यक्रमातही देवादिकांना स्थान मिळू लागले आहे. अर्थात, भाजपने केलेल्या जबरदस्त वातावरणनिर्मितीमुळे डाव्या नेत्यांना चेहर्‍याला शेंदूर फासण्याची बुद्धी होते आहे. मुस्लीमभाजपसोबत असल्यामुळे डाव्यांची अस्वस्थता कमालीची वाढली आहे. मुस्लिमांच्या मुळातच हळव्या असलेल्या भावना चेतवण्याचे कामसुरू झाले आहे. उत्तर प्रदेशातून कडव्या उलेमांची फौज त्रिपुरात आयात करून मुस्लीममोहल्ल्यात फिरवली जात आहे. ‘‘भाजप हा तुमचा शत्रू आहे. काफरांचा बळ देणार्‍या या पक्षाला मत देऊ नका,’’ असा प्रचार करत हे पोटार्थी उलेमा मुस्लीमवस्तीवस्तीत फिरतायत. या प्रचाराला बळी न पडता भाजपसोबत जाणार्‍या मुस्लिमांना मशीद बंदी केली जाते आहे. कब्रस्थानात जागा देणार नाही, अशी धमकी दिली जाते आहे. त्यात माणिक सरकार यांच्या काळ्या कारभारावर बेतलेला ’लाल सरकार’ हा सिनेमा प्रदर्शित होण्यास सज्ज असल्यामुळे माणिक सरकार यांचे माथे ठणकले आहे. डाव्यांनी हा सिनेमा कोणत्याही परिस्थितीत त्रिपुरात प्रदर्शित होऊ नये, असा चंग बांधला आहे. डाव्यांची स्थिती ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झालेली आहे. डाव्यांनी राज्यात केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला ४८ जागांवर घसघशीत विजय मिळत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आल्यामुळे अस्वस्थ झालेल्या माकपने जबरदस्त अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. राज्यातल्या कॉंग्रेस नेत्यांना गुंडाळण्यासाठी यापूर्वी डाव्यांनी केंद्रातल्या कॉंग्रेस नेत्यांशी सेटिंग केले, यावेळीही आमचे केंद्रातल्या भाजप नेत्यांशी सेटिंग झाले असल्याचा धादांत असत्य प्रचार डाव्यांनी सुरू केला आहे. निवडणूक जवळ येईल, तशी अशा अफवांना ऊत येणार आहे. रोजगारासाठी, रेशनसाठी सरकारवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या लोकांना लक्ष्य करून हा प्रचार करण्यात येत आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांत राज्यात भाजपला समर्थ पर्याय बनविण्यासाठी जीवाचे रान करणारे भाजपचे प्रदेश प्रभारी सुनील देवधर, प्रदेशाध्यक्ष विप्लब देब यांच्या प्रयत्नामुळे येत्या १८ फेब्रुवारीला माकपचा सत्तेचा पट उधळला जाणार असे चित्र स्पष्ट दिसत आहे. योग्य राजकीय निर्णय घेऊन भाजपने आपली बाजू भक्कमकेली आहे. त्यामुळे सत्ताधारी माकपची अवस्था एखाद्या कोपर्‍यात कोंडलेल्या मांजरासारखी झाली आहे. आता दहशतीचे हत्यार वापरल्याशिवाय सत्ता राखणे कठीण असल्याचे डाव्यांच्या लक्षात आल्यामुळे उपजत असहिष्णू असलेला त्यांचा भयंकर चेहरा अधिकाधिक भेसूर होत चालला आहे. दुर्गमभागात दहशतीचे प्रयोग जोरात सुरू झाले आहेत.
 
 
- दिनेश कानजी 
@@AUTHORINFO_V1@@