२५ ला राष्ट्रीय मतदार दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2018
Total Views |
 
 
“ मतदार नोंदणी व मतदानाची आवश्यकता ” या विषयावर घोषवाक्य स्पर्धा
जनेतेनी सहभाग नोंदवावा
 
 

भंडारा: २५ जानेवारी २०१८ रोजी ८ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या असून भंडारा जिल्हयात जिल्हास्तरावर राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी आयोगाने सुलभ निवडणूका हा विषय घोषित केला आहे.
 
त्या अनुषंगाने अपंग घटकांना निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेणे सुलभ व्हावे या हेतून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणारआहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भंडारा जिल्हयातील जनतेने या कार्यक्रमात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सहभागी होण्यासाठी मतदार नोंदणी व मतदानाची आवश्यकता या विषयावर घोषवाक्य स्पर्धेचे अयोजन केले आहे.
 
घोष वाक्याची तपासणी जिल्हास्तरावरील नेमलेल्या समितीकडून करण्यात येईल. तीन उत्कृष्ट घोषवाक्य धारकांना बक्षीस व जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल. जिल्हयातील जनतेला, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, सर्व राजकीय पक्ष, सर्व एनजीओ यांनी या घोषवाक्य स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@