बुलढाणा जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करा- पांडुरंग फुंडकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
विविध विषयांचा पालकमंत्री यांनी घेतला आढावा
कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी प्रसिद्ध कराव्या
 


बुलढाणा : जिल्ह्यामध्ये विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या कामांमुळे जिल्हा विकास वाटेवर अग्रेसर होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मिती कामांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. जी कामे सुरु आहेत ती गतीने पूर्ण करावी आणि जी सुरु करण्यात येणारी आहेत, ती त्वरित सुरु करावी, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेतांना पालकमंत्री बोलत होते. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये प्राप्त निधीचा पूर्णपणे विनियोग करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, मिळालेला पूर्ण निधी मार्चअखेर खर्च झाला पाहिजे. प्रत्येक विभागाने निधी अखर्चित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच जलयुक्त शिवारची कामे विहित कालावधीत पूर्ण करावी. निवडलेले गाव पाण्याच्या ताळेबंदानुसार जलयुक्त करावे.
 
त्याचप्रमाणे चिखली-खामगाव, अजिंठा-बुलढाणा, मेहकर-चिखली, नांदुरा-जळगाव जामोद या महामार्गांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावी. शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग बांधवासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्यांना त्रास होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावानुसार शेतमाल विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर आणावा. सर्वप्रथम शेतमालाची ऑन लाईन नोंदणी करावी. ज्वारी, मका, उडीद व मुंग खरेदी ६ जानेवारी २०१८ पर्यंत करण्यात यावी. बँकांनी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकेच्या बाहेर प्रसिद्ध कराव्या. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमाफीचे एस एम एस संबंधित शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवावे.
@@AUTHORINFO_V1@@