लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

जिल्हयात २८ जानेवारी व ११ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम




अकोला : निरोगी आणि सुदृढ अकोल्यासाठी जिल्ह्यात येत्या २८ जानेवारी आणि ११ मार्च या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण प्रशासनाकडून हाती घेण्यात आली असून नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी केले आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणबाबत टापरे यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. 

जिल्ह्याचे भावी नागरिक असलेले शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि पोलिओपासून ते पूर्णपणे सुरक्षित राहावेत, यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओची लस पाजणे आवश्यक असून पालकांनी आपल्या मुलांना दक्षतेने ही लस पाजून घ्यावी, असे टापरे यांनी म्हटले. तसेच एकही बालक या लसीपासून वंचित ठेवू नये, याबाबतची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी, अशी सूचना देखील त्यांनी यावेळी दिली.

याच बैठकीत नियमित लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमातंर्गत लसीकरणाचे काम कमी असणाऱ्या भागांमध्ये अतिरिक्त लसीकरण सत्रे घेऊन जे लाभार्थी (माता व बालक) लसीकरणापासून वंचीत राहिले असतील अशा लाभार्थींना संरक्षित करणे हा या कार्यक्रमाचा उदेदश आहे. या अंतर्गत दिलेले उदिष्ट वेळेत पूर्ण करा असे ते म्हणाले.
जननी सुरक्षा योजने अंतर्गत पात्र गरोदर मातांना लाभ देण्याची सूचना करुन या योजनेसाठी लाभार्थ्यांचे आधार लिंक करण्याचे काम प्राधान्याने करण्यात यावे. जेणेकरुन डिबीटी प्रणालीव्दारे लाभर्थ्यांच्या खात्यात पैसे तातडीने जमा होतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@