शेतकरी कर्जमाफीतील प्रलंबित प्रकरणांसाठी तालुकास्तरिय समित्यांचे गठन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

शेतकऱ्यांना पात्रता सिध्द करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 
 
गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत आतापर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ ज्यांना मिळाला नाही अशा शेतकऱ्यांमधील पात्रता निश्चित करण्यासाठी तालुका स्तर समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती आता अंतिमरित्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या निश्चित करणार असून त्यांनतर पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे, अशी घोषणा जिल्हा प्रशासना करून करण्यात आली आहे.

बँकांमध्ये मिळालेल्या याद्यांमध्ये काही त्रुटी आढळून आल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणेमध्ये अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर या त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले व यातूनच गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत २८,९८४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. मात्र निकषांची पडताळणी राहीलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ही समिती या प्रलंबित शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी करून त्यांना योग्य तो लाभ मिळवून देईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

तसेच या समितीच्या रचनेविषयी देखील प्रशासनाने माहिती दिली असून या तालुका स्तरिय समितीमध्ये तालुका उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे अध्यक्ष असतील जिल्हा विशेष लेखापरिक्षक आणि सहकारी संस्थांच्या कर्ज प्रकरणांबाबत संस्थांचे लेखा परिक्षक सदस्य सचिव राहणार आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचा त्या तालुक्याचा विकास अधिकारी त्या तालुक्यांमधील असणाऱ्या बँकांचे शाखाधिकारी हे सदस्य असतील. ज्या कारणास्तव प्रकरण प्रलंबित आहे ती कागदपत्रे शेतकऱ्यांकडून प्राप्त करुन घेणे व त्या आधारे पात्र-अपात्र ठरविण्याबाबत अंतिम निर्णय घेणे व पात्र ठरलेला शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे आदी कामे ही समिती करेल.
@@AUTHORINFO_V1@@