लोकराज्य जानेवारी पोलिस विशेषांकाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |


गडचिरोली :
लोकराज्यचा जानेवारी पोलिस विशेषांक सर्व विषयांना समावेश करुन सर्वांगसुंदर पध्दतीने सादर करण्यात आला आहे. हा अंक निश्चितपणे संग्राह्य असा आहे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.पोलिस अधीक्षक कार्यालयात देशमुख यांच्या कक्षात झालेल्या एका कार्यक्रमात या अंकाचे विमोचन डॉ देशमुख यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.  यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक हरी बालाजी आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
संपूर्ण राज्यातील पोलिस दलाच्या सर्व क्षेत्रातील कामगिरीचा आढावा या अंकात घेण्यात आला असून याचा मुद्रणाचा दर्जा देखील व्यावसायिक अंकांच्या बरोबरीचा आहे. हा अंक सर्वांनी संदर्भग्रंथ स्वरुपात ठेवावा असा झाला आहे, असे डॉ देशमुख म्हणाले.  विविध स्वरुपाचे विशेषांक काढण्याची परंपरा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आरंभापासून जपली आहे. जानेवारी महिन्याचा अंक पोलिस दलाच्या सर्वच क्षेत्रातील प्रगतीची माहिती देणारा अंक आहे. यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि डॉ. रणजीत पाटील यांनी दलाविषयी माहिती दिलेली आहे. या खेरीज पांरपरिक पोलिस दल कामांसोबत, नक्षल मुकाबला, सागरी संरक्षण, वाहतूक, सायबर गुन्हेगारी आदी नव्या आव्हानांबाबत पोलिस दलाची सुसज्जता याबाबत मान्यवरांनी लेख लिहिलेले आहे, अशी जिल्हा माहिती अधिकारी दैठणकर यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@